sahakar-maharshi-sugar-mill-creates-record-sugar-production | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

'सहकारमहर्षी'ने ८५ दिवसात केले सात लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

सरकारनामा
बुधवार, 16 जानेवारी 2019

अकलूज : सहकारमहर्षी साखर कारखान्यात उत्पादित सात लाख एकव्या साखर पोत्यांचे पूजन संचालिका कुमाबाई क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व अन्य संचालक उपस्थित होते.  

यशवंतनगर  : येथील सहकारमहर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या सात लाख एकव्या साखर पोत्यांचे पूजन संचालिका कुमाबाई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सीझन 2018-2019चा ऊस गळीत हंगाम सोमवार, ता. 22 ऑक्‍टोबर रोजी सुरू झाला. आजअखेर सहा लाख 68 हजार 918 मे. टन उसाचे गाळप होऊन सात लाख 17 हजार 850 साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. सरासरी साखर उतारा 11.00 टक्के व आजचा साखर उतारा 11.28 टक्के आहे. 

सध्या प्रतिदिन आठ हजार मे. टनापेक्षा जादा उसाचे गाळप होत आहे. तसेच बगॅसवर आधारित 33 मेगावॉट क्षमतेच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पामध्ये आजअखेर पाच कोटी 78 लाख 84 हजार 173 युनिट वीज निर्माण होऊन तीन कोटी 49 लाख 87 हजार 394 युनिट वीज विक्री केली.

 चालू सीझनमध्ये उपपदार्थ प्रकल्पातील डिस्टिलरीमध्ये आजअखेर 55 लाख 46 हजार 689 लिटर्स रेक्‍टिफाईड स्पिरीट उत्पादन झाले. 17 लाख दोन हजार 627 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले. ऍसिटिक ऍसिड प्रकल्पामध्ये 891 मे. टन ऑसिटाल्डी हाईड व 528 मे. टन ऑसिटीक ऍसिडची निर्मिती झाली, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक नामदेव ठवरे, लक्ष्मण शिंदे, सुरेश पाटील, धनंजय चव्हाण, शंकरराव माने-देशमुख, विजय माने-देशमुख, विजय पवार, रावसाहेब मगर, राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे, विश्‍वास काळकुटे, भारत फुले, चांगदेव घोगरे, सतीश शेडगे, संचालिका कमल जोरवर, माजी उपाध्यक्ष रामचंद्र सावंत-पाटील, माजी संचालक मोहन लोंढे, रामचंद्र चव्हाण यांच्यासह रामचंद्र ठवरे, धनंजय दुपडे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख