उल्हासनगरातील व्यावसायिक सागर उटवाल यांचा शिवसेनेत प्रवेश - ओमी कलानींची टीम पोखरली

टीम ओमी कलानीचे विश्वासू सहकारी उल्हासनगर विधानसभेचे व मीडिया अध्यक्ष सागर उटवाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. उटवाल यांच्यासोबतमोठ्या संख्येने युवा ब्रिगेडही शिवसेनेत आल्यामुळे ओमी कलानीची टीम पोखरली आहे.
उल्हासनगरातील व्यावसायिक सागर उटवाल यांचा शिवसेनेत प्रवेश - ओमी कलानींची टीम पोखरली

उल्हासनगर : टीम ओमी कलानीचे विश्वासू सहकारी उल्हासनगर विधानसभेचे व मीडिया अध्यक्ष सागर उटवाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. उटवाल यांच्यासोबत मोठ्या संख्येने युवा ब्रिगेडही शिवसेनेत आल्यामुळे ओमी कलानीची टीम पोखरली आहे. 

यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, विरोधीपक्षनेते धनंजय बोडारे आदी उपस्थित होते.

 फेब्रुवारी 2017 मध्ये पार पडलेल्या पालिका निवडणुकीत टीम ओमी कलानी सोबत काम केले. मात्र, त्यांच्या टीम मधील काही सदस्य भांडणे लावण्याचे काम करत असल्याने उटवाल यांची घुसमट होत होती. ओमी कलानींसोबत त्यांचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. मात्र, होणाऱ्या घुसमटीमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. ''त्यामुळेच आपण टीम मधून बाहेर पडलो असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापुढे शिवसेनेशी प्रामाणिक राहून पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली काम करणार,'' असे सागर उटवाल यांनी सांगितले.

दरम्यान संपूर्ण उल्हासनगरात सागर उटवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन करणारी मोठमोठी 'कटाऊटस्' झळकली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com