sadashiv sapkal join shivsena | Sarkarnama

काँग्रेस, भाजप फिरून सदाशिव सपकाळ पुन्हा आले 'मातोश्री'च्या दारात!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

शनिवारी मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ते आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करतील.

मेढा (सातारा)  : शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व त्यानंतर भाजपमध्ये अशी भटकंती करूनही न्याय न मिळाल्याने माजी आमदार सदाशिव सपकाळ पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या (शनिवारी) मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ते आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करतील.

सध्या भाजप मध्ये असलेले सदाशिव सपकाळ हे पश्चिम महाराष्ट्रात प्रथम शिवसेनेतुन जावळी मतदारसंघातून आमदार झाले. सत्तेशिवाय विकास नाही हा उद्देश डोळ्यापुढे देऊन त्यांनी श्री. सपकाळ यांनी आघाडी शासनाच्या काळात काँग्रेस मध्ये प्रवेश केला. पण त्याना फारसे काम करता आले नाही. आघाडीची सत्ता गेल्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. सत्तेसोबत राहून ही त्यांना जावलीचा म्हणावा तेवढा विकास करता आला नाही. कारण त्यांना सत्ताधाऱ्यांनी सहकार्यच केले नाही. त्यामुळे ज्या पक्षातून आपण प्रथम आमदार झालो त्या शिवसेनेत पुन्हा जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
 
नुकतीच मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य एकनाथ ओंबळे यांच्यासह मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोबत सदाशिव सपकाळ यांची बैठक होवून येथेच त्यानी पुन्हा शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.   

संबंधित लेख