sadabhu khot challenges raju shetty | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

मोदींना आव्हान देणाऱ्या शेट्टींमध्ये हे आव्हान स्विकारण्याची हिंमत आहे कां?

संपत मोरे
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

राजू शेट्टी महान माणूस आहे!

पुणे : 'राजू शेट्टी हे महान नेते आहेत. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी देशात अजून माणूसच जन्माला आलेला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं', अशी उपरोधिक प्रतिक्रिया कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

खासदार राजू शेट्टी यांनी 'महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या विरोधात लढावे' असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना सदभाऊंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

खोत म्हणाले, 'राजू शेट्टी महान माणूस आहे. त्यांनी थेट देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या विरोधात लढण्याचे आव्हान दिले होते. त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार? त्यांच्या विरोधात लढण्यासाठी देशातच माणूस जन्माला आलेला नाही? शेट्टींनी अशी प्रत्येकाला आव्हाने देण्यापेक्षा स्वतःचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघात उभे रहावे. मग त्यांना त्यांची ताकद कळेल, असेही खोत म्हणाले.
 

संबंधित लेख