सदाभाऊ बसं झाली तुमची नाैटंकी : गाेपीकिशन बाजाेरिया

कृषी राज्यमंत्री केवळ शेतकऱ्यांचा कळवळा येत असल्याचा अाव अाणत राज्यभर केवळ बैठकांचे साेपस्कार करीत फिरत अाहेत. सदाभाऊ अाता बसं झाली तुमची नाैटंकी !-गाेपीकिशन बाजाेरिया
Gopikishan -Bajoria-sadabhau-khot
Gopikishan -Bajoria-sadabhau-khot

अकाेला :  पश्चिम विदर्भातील शेतकरी अात्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यास राष्‍ट्रीयकृत बॅंक माेठ्या प्रमाणात दिरंगाई करीत असताना त्यांच्यावर कुठलीच कठाेर कारवाई करण्यात अाली नाही.

कृषी राज्यमंत्री केवळ शेतकऱ्यांचा कळवळा येत असल्याचा अाव अाणत राज्यभर केवळ बैठकांचे साेपस्कार करीत फिरत अाहेत. सदाभाऊ अाता बसं झाली तुमची नाैटंकी , अाठ दिवसांच्या अात सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलने अांदाेलनाचा एल्गार पुकारणार असल्याचा इशारा शिवसेनेचे अामदार गाेपीकिशन बाजाेरिया यांनी ‘सरकारनामा’ शी बाेलतांना दिला.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी पीक कर्जासंदर्भात शनिवारी (ता.9) अकाेल्यात विभागीय अाढावा बैठक घेतली. या बैठकीत पीक कर्जाचे वाटपात राष्ट्रीयकृत बॅंकांची माेठ्या प्रमाणात दिरंगाई हाेत असल्याचे उघडकीस अाले.

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बॅंकेचे हेलपाटे खावे लागत असताना शासन व प्रशासन मात्र, बैठकांचे साेपस्कार करण्यापलीकडे काहीच करीत नसल्याच्या मुद्दावर अामदार गाेपीकिशन बाजाेरिया सडकून टिका केली. शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाले नाही तर त्यांना सावकरांकडे जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अाणि कर्जाच्या अाेझ्याखाली दबून शेतकरी पुन्हा अात्महत्येकडे वेळेल.

येवढी गंभीर परिस्थिती असताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा अाव अाणत केवळ बैठकांचा देखावा करीत असल्याचा अाराेप अामदार बाजाेरिया यांनी केला. ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भराेश्यावर तुम्ही येवढे माेठे झालातं, तुम्ही त्यांचे झाला नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे तुम्ही काही भले कराल ही अपेक्षा करणेच चुकीचे अाहे.

अकाेल्यासह वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती हे शेतकरी अात्महत्याग्रस्त जिल्हे अाहेत. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी लढण्यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशिल अाहे. शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप वेळेत मिळाले नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना स्टाईल अांदाेलन करणार असल्याचा इशारा अामदार बाजाेरिया यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com