sadabhau said raju shetty in doing nautanki | Sarkarnama

राजू शेट्टींचे आंदोलन म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा स्टंट : सदाभाऊ खोत 

संपत मोरे 
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

पुणे : "साखर कारखानदार लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्या हातात हात घालून काम करणार आहेत. मग तुम्ही शेतकऱ्यांना साखर कारखानदारांच्या विरोधात भडकावून उगीचच त्यांची डोकी का फोडताय ?"असा सवाल कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना विचारला आहे. 

"जर कायद्यानुसार कारखान्यांनी एफआरपी देणे बंधनकारक आहे, ती दिली नाही तर त्यांच्याविरुद्ध आंदोलन करता येईल. असे असताना हे आंदोलन म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा स्टंट नव्हे का ?"असेही ते म्हणाले. 

"गेल्यावर्षी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये 3400 रुपये चा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी केली आणि या वर्षी एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी केली. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी चारशे ते साडेचारशे रुपये मागणी कमी केली. गेल्या वर्षीच्या आणि यावर्षीचा उत्पादन खर्चामध्ये अशी कोणती तफावत झाली की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झालेला आहे. खताच्या किंमती कमी झाल्या का ? मजुरीचा दर कमी झाला का ? असे प्रश्‍नही त्यांनी केले. 

याचा अर्थ सरळ आहे की, गेल्यावर्षीची केलेली मागणी आणि या वर्षीची मागणी ही उत्पादन खर्चावर आधारित नव्हती, तर ह्या मागण्या सवंग लोकप्रियतेसाठी केल्या गेल्या होत्या.त्या शेतकऱ्यांच्या कळवळ्यापोटी नव्हत्या."असा आरोप सदाभाऊनी केला आहे. 

संबंधित लेख