सदाभाऊ, तेवढं वीज कनेक्‍शनचं बघा..! 

जिल्ह्यात कृषी पंपाची दहा हजार नऊशे कनेक्‍शन केवळ निधीअभावी प्रलंबित आहेत. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे सह पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. त्यांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक असून सातारा जिल्ह्यावर विशेष प्रेम असूनही शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज कनेक्‍शनबाबत सदाभाऊंकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. सदाभाऊ किमान वीज कनेक्‍शनचे तेवढ बघा...अशी हाक जिल्ह्यातील शेतकरी मारत आहेत.
सदाभाऊ, तेवढं वीज कनेक्‍शनचं बघा..! 
सदाभाऊ, तेवढं वीज कनेक्‍शनचं बघा..! 

सातारा : जिल्ह्यात कृषी पंपाची दहा हजार नऊशे कनेक्‍शन केवळ निधीअभावी प्रलंबित आहेत. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे सह पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. त्यांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक असून सातारा जिल्ह्यावर विशेष प्रेम असूनही शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज कनेक्‍शनबाबत सदाभाऊंकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. सदाभाऊ किमान वीज कनेक्‍शनचे तेवढ बघा...अशी हाक जिल्ह्यातील शेतकरी मारत आहेत. 

सध्या पावसाने ओढ दिली आहे. पावसाअभावी खरिप पिके धोक्‍यात येण्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यातच जिल्ह्यातील कृषी पंपाची वीज कनेक्‍शन मागणीचे साधारण दहा हजार नऊशे अर्ज प्रलंबित आहेत. हा प्रश्‍नावर अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविण्यात आला, पण त्यावर कोणतीच उपाय योजना निघालेली नाही. उलट शेती पंपाची थकबाकीची आकडेवारी काही कोटीत असल्याचे सांगून सर्वजण दुर्लक्ष करत आहेत. अलिकडे सहपालकमंत्री पद मिळाल्यापासून सदाभाऊ खोत यांनी जिल्ह्यात अधिकच लक्ष घातले आहे. सदाभाऊंची मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याने लोकांनाही आपली कामे होतील, अशी अपेक्षा आहे. 

कृषी व पणन राज्यमंत्री पद त्यांच्याकडे असल्याने सदाभाऊंनी कृषीपंपाच्या वीज कनेक्‍शनचा मुद्दा लावून धरल्यास किमान एक व दोन पोलचे कनेक्‍शन वाटप तरी सुरू होऊन प्रतिक्षा यादीतील संख्या कमी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकरी सदाभाऊ बाकीचे राजकारण बाजूला राहू देत तेवढं आमच्या शेती पंपाच्या विज कनेक्‍शनचे बघा, अशी हाक शेतकरी देऊ लागले आहेत. पावसाने ओढ दिल्याने खरिप पिकांना पाणी देऊन का होईना जगवावी लागतील. पण पाणी असून उपयोग नाही, वीज कनेक्‍शन नसल्याने शेतकऱ्यांना हातची पिके गमवावी लागणार आहेत. त्यामुळे सदाभाऊ शेतकऱ्यांच्या या आर्त हकेला साथ देणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com