सदाभाऊ खोतांचे हेलिकॉप्टर भरकटले, धूर करून दिशा दाखवली

रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सोयगांव तालुक्‍यात आलेले राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे हेलिकॉप्टर आज भरकटले होते. हेलिकॉप्टरला योग्य दिशाच मिळत नसल्याने पायलटने सुमारे तासभर परिसरात हवेतच घिरट्या घातल्या. शेवटी हेलिपॅडजवळ धूर करून हेलिकॉप्टरला दिशा दाखवल्यानंतर ते जमिनीवर उतरवण्यात आले.
सदाभाऊ खोतांचे हेलिकॉप्टर भरकटले, धूर करून दिशा दाखवली

औरंगाबाद : रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सोयगांव तालुक्‍यात आलेले राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे हेलिकॉप्टर आज भरकटले होते. हेलिकॉप्टरला योग्य दिशाच मिळत नसल्याने पायलटने सुमारे तासभर परिसरात हवेतच घिरट्या घातल्या. शेवटी हेलिपॅडजवळ धूर करून हेलिकॉप्टरला दिशा दाखवल्यानंतर ते जमिनीवर उतरवण्यात आले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सदाभाऊ खोत यांच्या सभेचे आयोजन सोयगांव तालुक्‍यातील निंबायती गावात करण्यात आले होते. या सभेसाठी खोत हेलिकॉप्टरने आले. तत्पुर्वी रात्रीच हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलीपॅडची व्यवस्था करण्यात आल्याचे ठिकाण संबंधित पायलटला पाठवण्यात आले होते. पण सकाळी अचानक त्यात बदल करण्यात आला आणि दुसऱ्या ठिकाणाची माहिती देण्यात आली. हेलीपॅडच सापडत नसल्याने अखेर हेलिकॉप्टरला तासभर हेवतच घिरट्या माराव्या लागल्या. हेलिकॉप्टर लॅंड करण्यासाठी रात्री वेगळे आणि सकाळी वेगळे असे दोन लोकेशन मिळाल्याने हा घोळ झाल्याचे पायलट एम.बॉबी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. रात्री सोयगाव आणि मंगळवारी सकाळी रामपुरा असे वेगवेगळे दोन लोकेशन मिळाल्याने पायलट हेलिकॉप्टरसह सोयगाव आणि गलवाडा गावावारच घिरट्या घालत होते.

विशेष म्हणजे जिल्ह्याच्या नकाशातच नसलेले रामपूरचे लोकेशन पायलटला सापडलेच नाही आणि गोंधळ उडाला. तासभर हेलिकॉप्टरला हवेत ठेवावे लागले. अखेर रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, सुरेश बनकर,ज्ञानेश्वर मोटे आदी कार्यकर्त्यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हेलिपॅडच्या दिशेने जाळ करून धूर केला. त्यानंतर हेलिकॉप्टरला अजिंठ्या डोंगराच्या पायथ्याजवळ रामपुरा गावाचे लोकेशन सापडले. तासभर हवेत फिरल्यानंतर सदाभाऊ खोतांचे हेलिकॉप्टर लॅंन्ड झाले आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्‍वास टाकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com