Sadabhau Khot writes to Kejrival on onion | Sarkarnama

सदाभाऊंचे राज्यातील कांदा विक्रीसाठी केजरीवाल यांना पत्र

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई : दिल्लीमध्ये तेथील राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानांत महाराष्ट्रातील कांदा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती करणारे पत्र राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिहिले आहे.

मुंबई : दिल्लीमध्ये तेथील राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानांत महाराष्ट्रातील कांदा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती करणारे पत्र राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिहिले आहे.

 
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचा माल चार-पाच वर्षांपूर्वी दिल्लीत रेशन दुकानांवर विकण्यात आला होता. यंदा महाराष्ट्रात कांद्याचे भरघोस उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्राहकांनाही रास्त दरात कांदा मिळण्यासाठी दिल्ली सरकारला व्यवस्था करता येईल, अशी अपेक्षा खोत यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. या संदर्भात कांदा उत्पादकांची संघटना आणि दिल्ली सरकार यांच्या दरम्यान बैठकही आयोजित करता येईल, असे खोत यांनी सुचविले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कांद्याचा दर्जा इतर कोणत्याही राज्यातील कांद्यात नाही. इतर राज्यांची मागणी लक्षात घेत पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातील कांदा विक्रीसाठी पाठवावा, असे निर्देश खोत यांनी दिले. राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी (ता. 25) मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत खोत बोलत होते.

राज्यातील कांदा इतर राज्यात निर्यात करण्यासाठी पणन मंडळ, महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अभ्यासमंडळ तयार करावे. या पथकाने पंजाब बाजार समितीतील कांद्याची आवक-जावक, राज्यातील कांदा साठवण्यासाठी लागणारे गोदाम, बाजारभाव, लहान व्यापारी आदींबाबत माहिती घ्यावी, असे निर्देशही खोत यांनी दिले.

मूग, उडीद खरेदी नोंदणीची केंद्रे 

मूग व उडीद खरेदी प्रक्रियेतील शेतकऱ्यांचा त्रास वाचावा आणि खरेदी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात 3 ऑक्‍टोबरपासून उडीद आणि मूग खरेदीची 83 नोंदणी केंद्रे सुरू करण्यात येणार येतील, अशी माहितीही खोत यांनी या वेळी दिली. मूग व उडीद खरेदीची तारीख शेतकऱ्यांना ऍपद्वारे कळवली जाईल, त्यामुळे वेळेची बचत होईल, असा विश्वासही खोत यांनी व्यक्त केला.
 

संबंधित लेख