sadabhau khot statement about maratha community | Sarkarnama

#MarathaReservation मुठभर घराण्यांमुळेच मराठा समाज अडचणीत : सदाभाऊ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

सातारा : मराठा समाजाच्या मतांवर गेल्या 50 वर्षात काही मराठा घराणी मोठी झाली. या मुठभर घराण्यांमुळे संपूर्ण मराठा समाज अडचणीत आला आहे. पण सध्याचे सरकार व मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहेत, असे मत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. 

कऱ्हाड तालुक्‍यातील विंग शिंदेवाड फाटा येथील एका लग्न समारंभासाठी ते आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. सदाभाऊ खोत म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सध्याचे सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री या समाजाला निश्‍चितपणे न्याय देऊ शकतात. गेल्या 50 वर्षात याच मराठा समाजाच्या मतांवरच काही मराठा घराणी मोठी झाली. ती स्वत:च अधिकृत सम्राट झाली. या मुठभर मराठ्यांनी संपूर्ण मराठा समाजाला अडचणीत आणले. आज ज्या अवस्थेतून मराठा समाज जात आहे, त्याला हीच मुठभर मराठा घराणीच जबाबदार आहेत. आता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकरच शासनाला सादर होईल. भक्कमपणे पुरावे तयार करून तो न्यायालयात महाराष्ट्र शासन मांडले. जेणे करून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख