सदाभाऊंनी राजू शेट्टींवरचा वचपा काढला....मानेंचे `कार्ड` यशस्वी

सदाभाऊंनी राजू शेट्टींवरचा वचपा काढला....मानेंचे `कार्ड` यशस्वी

पुणे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्याकडून कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीच 'धोबीपछाड' केले आहे. अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत माने हे 60 हजाराने पुढे होते. शेट्टी यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसनेही रसद पुरवूनही त्यांचा पराभव होण्याच्या मार्गावर झाला आहे. 

हातकणंगले लोकसभा निवडणुक सदाभाऊ खोत यांनी खूपच मनाला लावून घेतली होती.या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रचार केला. दोन लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या विजयासाठी मन लावून प्रचार करणारे खोत यावेळी शेट्टीचा पराभव व्हावा म्हणून जीवाचे रान करताना दिसत होते. त्यांची भाषणे खूपच आक्रमक झाली. शेट्टी यांच्या समर्थकांनी गेल्या वर्षभरात खोत यांना वेगवेगळ्या माध्यमातून जो त्रास दिला अशी खोत यांची भावना निर्माण झाली होती त्याचा राग खोत यांच्या मनात होता.तो पुरेपूर काढला.

हातकणंगलेची निवडणूक शेट्टी विरोधी माने अशी न होता ती `खोत विरुद्ध शेट्टी `अशीच झाली. शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या सदाभाऊंना त्यांच्या उणिवा माहीत होत्या.त्या त्यानी जाहीरपणे सांगितल्या. या निवडणुकीत सदाभाऊ यांनी मतदारसंघातील बहुजन समाजाला साद घातली. ही साद नेमकी कोणत्या समाजाला होती?याचे उत्तर आता मिळाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सदाभाऊ यांनी शेट्टी आणि मानेची कुस्ती लावली आणि त्यानी मानेच्या माध्यमातून शेट्टी यांना धोबीपछाड केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com