sadabhau khot satara meeting | Sarkarnama

सदाभाऊ खोतांच्या बैठकीचा निरोप देऊनही आमदार फिरकले नाहीत!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, आम्हीही जिल्हा प्रशासनाची बाजू सरकारकडे मांडणार असून नेमकी परिस्थिती का खालावली याची कारणे आणि ज्या ठिकाणी चांगली असेल
तेथील कारणांचा उल्लेखही करणार आहोत. 

सातारा: खटाव तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीची अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष पहाणी करून त्याचा अहवाल येत्या रविवारपर्यंत द्यावा. सोमवारी हा अहवाल

मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार असल्याची जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली.

दरम्यान, आमदार जयकुमार गोरे वगळता जिल्ह्यातील एकही आमदार निरोप देऊनही या बैठकीस उपस्थित राहिला नाही. 

जिल्हा टंचाई आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी माणचे आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर तसेच टंचाईग्रस्त तालुक्‍यातील अधिकारी उपस्थित होते. 

सुरवातीला खटाव तालुक्‍यातील मंडलनिहाय दुष्काळ व टंचाईची नेमकी परिस्थिती आहे. चारा, पाण्याची किती उपलब्धता आहे, याचा आढावा सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला. नऊ मंडलांपैकी वडुज मंडल दुष्काळात बसले आहे, उर्वरित आठ मंडले वगळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर आमदार जयकुमार गोरे यांनी प्रशासकिय पातळीवरून नेमके काय काम केले आहे, याची माहिती मागितली. त्यावर कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी माहिती दिली. पण त्यांच्या उत्तराने कोणाचेच समाधान झाले नाही. 

मंत्री सदाभाऊ यांनी गावनिहाय माहिती घेऊनच निर्णय घेतला पाहिजे, अशी भुमिका मांडली. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, खटाव तालुक्‍यात चांगला पाऊस झाल्यामुळे पेरणी
झाली. त्यामुळे खरिप पेरणीवरून आता काहीही करता येणार नाही, असे सांगितले. खरिप ऐवजी रब्बी पेरणी व सध्याची पिक परिस्थितीचा मुद्दा धरून अहवाल करता येईल, असे मत
आमदार गोरे यांनी मांडले.  
 

नाश्‍त्याला केळी, पोहे अन्‌ बंद बाटलीतून पाणी 

टंचाई आढावा बैठकीस तालुकानिहाय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी सकाळी नऊ वाजल्यापासून अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन बसले होते. त्यामुळे बैठकीत त्यांना नाश्‍ता म्हणून केळी, पोहे आणि बाटली बंद पाणी देण्यात आले होते. अधिकाऱ्यांच्या निम्म्या रांगेपर्यंत नाश्‍ता वाटप झाल्यावर नाश्‍ताच संपला. त्यामुळे उरलेल्या रांगेत बसलेल्या अधिकाऱ्यांनी याबाबत शिपायाला विचारणा केली. त्याने नाश्‍ता संपला आहे, तुम्ही टंचाई अधिकाऱ्याला विचारा असे सांगितले. 
 

संबंधित लेख