मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो, तुम्ही खासदारकीचा देणार का ? : सदाभाऊ खोत 

मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो, तुम्ही खासदारकीचा देणार का ? : सदाभाऊ खोत 

मुंबई : तुम्हीही भाजपच्याबरोबर निवडणूक लढवली आहे. मीही भाजपबरोबरच मंत्री आहे. मी मंत्रीपदाचा राजीनामा देतो, तुम्ही खासदारकीचा राजीनामा देणार का ? 
असे आव्हान पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना आज दिले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकण्यात आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवी संघटना निर्मीतीच्या मसूदा समितीची घोषणा मुंबईत केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे माजी कार्याध्यक्ष ऍड. सतीश बोरूडकर, स्वाभिमानीचे विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष पांडूरंग शिंदे आदी उपस्थित होते. 

मसूदा समिती 21 सप्टेबररोजी घटस्थापनेच्या दिवशी कोल्हापूर येथे घोषणा करेल. ही मसूदा समिती संघटनेचा झेंडा आणि लोगो कसा असावा, संघटनेचे नाव काय असावे हे ठरवणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 30 सप्टेबररोजी इजलकरंजी सोने लुटायचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस यावे. म्हणून दसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा मेळावा घेणार असल्याचे खोत यांनी सांगितले. 

खोत पुढे म्हणाले, " स्वाभिमानीने भाजपशी युती केली होती. त्यात लोकसभेत दोन जागा देण्यात आल्या होत्या. तर विधानसभेला काही जागा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मला मंत्रीपद मिळाले. एका वर्षातील कालावधीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सरकारमध्ये काम केले. मार्केट कमिटीचा कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला नियमन मुक्त करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांना ठिबकचे थकित अनुदान मिळवून दिले. तूर खरेदी केंद्रावर जात तूर खरेदी करण्यात आली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला.' 

" राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी आरोपप्रत्यारोप झाले तरीही खणखरपणे कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्यमंत्री म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे काम करत असताना पातळी घसरलेले आरोप झाले. तरीही मी काम सुरूच ठेवले. मधल्या काळात आजारपणात काही काळ गेला. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आपेक्षा, विरोधकांचे आरोप, अंतर्गत घरभेद्यांचा सामना करणे असे तिन्ही पातळीवर काम करत गेलो. मला शब्बासकी देण्याऐवजी माझे पाय कापण्याचे काम केले. चौकशी समिती नेमली त्यांच्यातील सदस्यांपेक्षा माजे चळवळीतील वय जास्त होते. तरीही मला जाणिवपुरक आपणानीत करण्यात आले, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com