Sadabhau Khot Narayan Rane to launch new outfit | Sarkarnama

 खोतांच्या नव्या संघटनेचा झेंडा तयार, राणेंचे मात्र तळ्यात मळ्यात

सरकारनामा  ब्युरो 
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई   : घटस्थापनेच्या मुहुर्तावर उद्या गुरुवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपल्या  राजकीय वाटचालीबाबत कशी भूमिका मांडतात याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून बाहेर पडून राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आपल्या नव्या संघटनेच्या नावाची घोषणा करणार आहेत.   तर दुरारीकडे कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या बंडखोर तंबूत स्पष्ट भूमिका माहीत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्थिरतेचे वातावरण असल्याचे समजते.   

 तीन दिवसापूर्वी नारायण राणे यांनी  स्वतंत्र समर्थ विकास पॅनेलची घोषणा करून ग्रामपंचायत निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्थापनेच्या दिवशी मी बोलतो असे राणे यांनी सांगितले असले तरी राणे काय करणार आहेत, हे त्यांच्या जवळच्याही लोकांनाही माहीत नाही. 

वेगळा पक्ष काढणार की भाजप बरोबर पुढे जाणार यावरून  राणे समर्थक गोंधळलेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅनेल काढले असले तरी राणे नवा पक्ष काढण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचे त्यांनी निश्चित केले असून आता आपल्याला काय मिळते, याकडे त्यांचे लक्ष असल्याची माहिती सूत्रांनी दिली.      

           राणेंचे धाकटे चिरंजीव  आमदार नितेश राणे यांची स्वाभिमान नावाची संघटना असून या संघटनेमार्फत   त्यानी  विविध आंदालने केली आहेत.  काँग्रेस पक्षाचे आमदार असताना  स्वतंत्र संघटनेच्या नावाने काम करण्यावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला होता.  सध्या नारायण राणे हे  काही दिवस समर्थ  विकास पॅनलच्या झेंड्याखाली सिधुदुर्गमध्ये आवाज देतील आणि  दसऱ्यानंतर भाजपशी घरोबा करतील, असे राजकीय वर्तुळात  बोलले जाते.

    दरम्यान ,सदाभाऊ यांच्या  नव्या संघटनेची सर्व तयारी झाली असून कोल्हापूरला राज्यभरातील २ हजार प्रमुख कार्यकर्त्यांच्या हाती ते नवा झेंडा देतील. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज मार्केट यार्डच्या सभागृहात मसुदा समितीची बैठक होऊन नंतर संघटनेचे नावाची घोषणा केली जाईल.असे सांगण्यात येते  

संबंधित लेख