Sadabhau Khot | Sarkarnama

बेदाणा जीएसटीमधून वगळा - सदाभाऊ खोत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जून 2017

मुंबई- बेदाण्यावरील ‘जीएसटी’ अखेर 12 टक्क्यांवरून 5 टक्के झाला आहे. या निर्णयामुळे बेदाणा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रानं वस्तू व सेवाकरामध्ये (जीएसटी) बेदाण्याचा समावेश केला होता. त्याचा फटका राज्यातल्या बेदाणा उत्पादकांना बसतो आहे, ही बाब कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ६ जून रोजी केंद्राला पाठवलेल्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून निदर्शनाला आणून दिली होती.

राज्यातील द्राक्षशेतीला वाचवण्यासाठी बेदाण्याला ‘जीएसटी’मधून  वगळण्याची गरजही सदाभाऊ खोत यांनी पत्रात नमूद केली होती.
दिल्लीत 'जीएसटी कौन्सिल'ची 16 वी बैठक झाली. या बैठकीत 66 वस्तुंवरील 'जीएसटी'मध्ये कपात केली आहे. त्यामध्ये बेदाण्यावरील 'जीएसटी' 12 टक्क्यांवरून 5 टक्के केला आहे. महाराष्ट्रात द्राक्ष हंगामात दरवर्षी २लाख मेट्रीक टनाचे बेदाण्याचे उत्पादन होते. बाजारपेठेतील बेदाण्याच्या दराचा विचार करता दरवर्षी ही उलाढाल ३२०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. केंद्राच्या निर्णयामुळे जीएसटीमध्ये ७ टक्क्यांची बचत झाल्यानं शेतकऱ्यांचे दरवर्षी जवळपास २०० ते २२५कोटी रुपये वाचणार आहेत. या निर्णयामुळे बेदाणा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत बोलताना कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ''बेदाण्यावरील 'जीएसटी' शून्य टक्के करावा अथवा किमान 5 टक्क्यांपर्यंत खाली आणावा यासाठी मी पाठपुरावा केला आहे. बेदाण्यावरील जीएसटी आता 12 वरून 5 टक्के झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ते शक्य झाले आहे. त्यांचे सहकार्य महत्वाचे ठरले आहे.''

संबंधित लेख