sada khot and raju shetty | Sarkarnama

खासदारकी वाचवण्यासाठी काहीजण, ज्यांचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले आहेत त्यांच्याशी गळाभेट घेत आहेत - खोत

संपत मोरे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे : " कोणीतरी पोरं टोर येतात आणि कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलन करतात, माझं आयुष्य आंदोलनात गेलं आहे, मी भूमिका घेऊन आंदोलन केली पण आजकाल आंदोलनाचा दर्जा खालावत चालला आहे. आंदोलनाच्या नावाखाली होणाऱ्या या भ्याड कृतींना व्यक्तीद्वेषाचा वास येतोय. अशा कृती करणारी लोक आंदोलक नसून चिलटं आहेत, त्यांनी समोर येऊन आंदोलन करावीत असे आव्हान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. 

"स्वतःला शेतकरी नेते म्हणणारे काही लोक ज्यांचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले आहेत त्यांच्याशी गळाभेट घेत आहेत "अशी जोरदार टीका खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली. काल परभणी येथे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर टोमॅटो फेकण्यात आले, त्यावर खोत यांनी सरकारनामाला प्रतिक्रिया दिली. 

"असली आंदोलन करणारी लोक चिलटं आहेत, अशा आंदोलनाला मी भीक घालत नाही. त्यांनी समोर येऊन आंदोलन करावीत मी एकटा यायला तयार आहे. मी चळवळीत घडलो आहे, चळवळीसाठी खस्ता खाल्या आहेत. माझ्या आयुष्यात मी आंदोलन केली पण ती कोणा व्यक्तीच्या विरोधात नव्हती तर व्यवस्थेच्या विरोधात होती. लोकांचा आवाज व्यक्त करणारी आंदोलन मी केली आहेत पण आजकाल कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलन केली जातात. व्यक्तीद्वेष डोळ्यासमोर ठेवून आंदोलन केली जातात. चांगलं काय आणि वाईट काय हे जनतेला कळत. ' 

" काही लोकांना शेतकऱ्याच्या हितापेक्षा स्वतःची खासदारकी वाचवायची आहे त्यासाठी ते कोणाशीही युती करायला लागले आहेत. ते ज्यांच्यासोबत गळाभेट घेत आहेत ते शेतकऱ्याचे कैवारी आहेत का ? असा सवाल त्यांनी शेट्टी यांना उद्देशून विचारला. 

संबंधित लेख