sachin tendulkar wants to see mandesh | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

सचिनला बघायचाय माणदेश!

संपत मोरे 
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

अभय वाघमारे यांनी सचिन तेंडुलकर यांना सांगितले की, कवितेत आणि आजच्या माणदेशाच्या वास्तवात काहीही फरक पडलेला नाही.

पुणे : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे माजी आमदार दिवंगत धोंडीराम वाघमारे यांचे पुत्र अभय वाघमारे यांनी नुकतीच सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली. तेव्हा सचिन तेंडुलकर म्हणाले, 'मला माणदेश बघायला यायचे आहे. लोकांच्या व्यथा जाणून घ्यायच्या आहेत.'

या भेटीत अभय यांनी, सचिन यांचे वडील रमेश तेंडुलकर आणि स्वत:चे वडील धोंडीराम वाघमारे यांची एक आठवण सांगितली. १९८३ साली  धोंडीराम वाघमारे यांनी लिहिलेल्या 'हुंदका' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सभारंभासाठी रमेश तेंडुलकर आले होते. 

माण तालुक्याचे दोनदा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार धोंडीराम वाघमारे हे जसे राजकीय नेते होते, तसेच कवि होते. त्यांचं गाव माणदेशातील वडजल. तालुक्यातील प्रश्नांनी अस्वस्थ होत त्यांनी हुंदका नावाचा कवितासंग्रह लिहिला. १९८३ साली त्याच्या प्रकाशन समारंभासाठी रमेश तेंडुलकर, दयानंद मस्के, सदाशिव पोळ उपस्थित होते. या संग्रहाला नारायण सुर्वे यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
 
अभय सध्या टाइम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत खेळत आहेत. एका कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांची आणि सचिन तेंडुलकर यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी कवितासंग्रहाची भेट त्यांना दिली. त्यातील रमेश तेंडूलकर यांचा फोटो पाहून सचिन यांनी 'माझ्या वडिलांचा फोटो इथं कसा ? असं अभय यांना विचारलं. तेव्हा मग अभय यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळेचा  सगळा इतिहास त्यांना ऐकवला. ते ऐकून सचिन भारावून गेले. ज्या भागाचा हुंदका धोंडीराम वाघमारे यांनी साहित्यातून मांडला त्या भागाला भेट देऊन तिथल्या लोकांच्या व्यथा ऐकणार असल्याचे यावेळी सचिन म्हणाले.   

संबंधित लेख