सर्व अभ्यासक्रमात क्रीडा शिक्षणाचा समावेश  करावा : सचिन तेंडुलकर  

मे महिन्यात सचिन तेंडुलकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देऊन‘तरुण आणि स्वस्थ भारत’ अभियान राबविण्याबद्दल पुढाकार घेतला होता. हे अभियान राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये राबवावे या दृष्टीने तेंडुलकर यांनी राज्यपालांशी चर्चा केली.
tendulkar
tendulkar

मुंबई :   " आपली तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ राहावी यासाठी क्रीडा हा विषय शिक्षणात समाविष्ट करावा. शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वांनी दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा, तसेच सर्व विद्यापीठांमध्ये ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ मोहीम राबवावी ,"असे प्रतिपादन  भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केले . 

सचिन तेंडुलकर यांनी गुरुवारी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.  

सचिन तेंडुल पुढे म्हणाले , " भारत जगातील सर्वात तरुण देश म्हणून उदयाला येत आहे .  २०२०साली भारताची  ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षाच्या आतील असेल. मात्र दुसरीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत आहे, तसेच लठ्ठपणामध्ये देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. "

यावेळी क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर,   डॉ. जयश्री तोडकर आदी उपस्थित होते.

विद्यापीठांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी सचिन तेंडुलकर यांचे अभिनंदन केले तसेच मोहिमेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ अभियानासाठी कॉर्पोरेट जगताचा सामाजिक दायित्व निधी देखील मिळू शकेल असे त्यांनी सांगितले. आदिवासीबहुल क्षेत्रामधील खेळाडूंना मदत करण्याच्या सचिन तेंडुलकर यांच्या भूमिकेचेदेखील राज्यपालांनी स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com