sachin sawant in aurangabad | Sarkarnama

भाजपचे दात त्यांच्याच घशात घालण्याची वेळ - सचिन सावंत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

आंदोलनात सहभागी असलेले कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी आता जनताच सरकारची वाट लावणार असे सांगत सरकारने निवडणुकीपुर्वी दिलेली आश्‍वासने आठवून पहावी असे आवाहन केले. तेव्हा पेक्षा पेट्रोल, डिझेलचे भाव दुप्पट- तिप्पट झाले आहेत. स्वयंपाकाचा गॅस 800 रुपये, पेट्रोल 90 तर डिझेल 80 रुपये लिटरपर्यंत पोहचले. यामुळे आता खऱ्या अर्थाने जनता रस्त्यावर उतरली आहे

औरंगाबाद : देशाच्या इतिहासात सर्वाधिक महाग पेट्रोल भाजप सरकारच्या काळात घ्यावे लागत आहे. बहोत हो गई पेट्रोल, डिझेल की मार अबकी बार मोदी सरकार असे तुम्ही म्हणत होतात ना ? सतत खोट बोलणाऱ्या मोदी सरकारचे दात आता त्यांच्याच घशात घालण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली. 

भारत बंद दरम्यान सचिन सावंत मुकूंदवाडी येथील महागाई विरोधातील आंदोलनात सहभागी झाले. देशाच्या इतिहासात गेल्या सत्तर वर्षात जेवढे महाग पेट्रोल डिझेल नव्हते तेवढे महाग झाले आहे. सर्वात महाग गॅस सामान्य माणसाला घ्यावा लागतोय. त्यामुळे हा बंद कुणा एका विशिष्ट पक्षाचा नव्हे तर हा जनतेचा बंद आहे. आता कोण जनतेच्या बाजूने आणि कोण सरकारच्या बाजूने हे ठरवण्याची वेळ आली आहे. जे जनतेच्या बाजूने आहेत ते बंदमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत. एवढा महागाईचा भडका उडालेला असतांनाही जे सरकारची भलावण करत आहेत ते 2019 मध्ये जमीनदोस्त होतील असा इशाराही सचिन सावंत यांनी दिला. 

जनताच सरकारची वाट लावणार 
आंदोलनात सहभागी असलेले कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी आता जनताच सरकारची वाट लावणार असे सांगत सरकारने निवडणुकीपुर्वी दिलेली आश्‍वासने आठवून पहावी असे आवाहन केले. तेव्हा पेक्षा पेट्रोल, डिझेलचे भाव दुप्पट- तिप्पट झाले आहेत. स्वयंपाकाचा गॅस 800 रुपये, पेट्रोल 90 तर डिझेल 80 रुपये लिटरपर्यंत पोहचले. यामुळे आता खऱ्या अर्थाने जनता रस्त्यावर उतरली आहे. आता जनता मोदी सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी ठणकावले. 

संबंधित लेख