sachin paylat and bjp | Sarkarnama

भाजपचे नेते 7 डिसेंबरला बॅगा घेऊन राज्याबाहेर निघून जातील - सचिन पायलट

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

उदयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची लढाई आता टिपेला गेली आहे. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे युद्ध जोरात सुरू आहे. कॉंग्रेसचे तरुण नेते व मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य दावेदार सचिन पायलट यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, राजस्थानमध्ये कॉंग्रेसलाच बहुमत मिळणार असून भाजपचे नेते आपल्या बॅगा घेऊन 7 डिसेंबरला राज्याबाहेर पळ काढतील. निकालानंतर भाजपचे नेते आपलं तोंड लपवायला राज्याबाहेर जातील असे त्यांना सुचवायचे आहे. 

पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले मोदी बेणेश्‍वर इथे सभेला आले तिथे ते देवळात गेल असते तर त्यांच्या पक्षाच्या जागा वाढल्या असत्या, पण आता से होऊनही काही उपयोग होणार नाही, कारण या राज्यात आता जनतेने आम्हाला निवडून द्यायचे ठरवले आहे आमच्या पक्षाचेचे सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्‍नावर कुणाचेही नाव न घेता ते म्हणाले मुख्यमंत्री कुणीही होऊ शकतो मात्र जो कोणी होईळ तो कॉंग्रेसचाच असेल हे नक्की. 

भाजपच्या वागण्यात आणि कृती करण्यात खूपच अंतर आहे, या पक्षाने तरुणांना रोजगार देण्याचे नुसतेच आश्‍वासन दिले, या आश्‍वासनाप्रमाणेच अन्य अनेक आश्‍वासने पाळलेली नाहीत. या सकारने सर्व थरातील लोकांची निराशा केली आहे असा आरोपही त्यांनी केला. 

संबंधित लेख