सचिन अंदुरेचे फेसबुक अकाउंट केले बंद

सचिन फेसबुकवर स्फोटक वक्तव्य पोस्ट करीत होता. कट्टर हिंदुत्वाच्या समर्थनार्थ तो सतत लिखाण करीत होता. सामाजिक कार्यकर्ते , हिंदुत्तर राजकीय नेते आणि पक्षविरोधी लिखाण तो करीत होता. फेसबुकवर त्याचे अकाउंट रविवारी पहाटे दोनपर्यंत दिसत होते.
सचिन अंदुरेचे फेसबुक अकाउंट केले बंद

औरंगाबाद : सीबीआयच्या ताब्यात असलेल्या सचिन अंदुरेचे फेसबुक अकाउंट डीऍक्टिव्ह करण्यात आले आहे. दाभोलकर यांच्या खून प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर खबरदारी म्हणून हि कार्यवाही करण्यात आल्याची बाब सूत्रांनी दिली आहे. सचिन अंदुरेला डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

#NarendraDabholkar

सचिन फेसबुकवर स्फोटक वक्तव्य पोस्ट करीत होता. कट्टर हिंदुत्वाच्या समर्थनार्थ तो सतत लिखाण करीत होता. सामाजिक कार्यकर्ते , हिंदुत्तर राजकीय नेते आणि पक्षविरोधी लिखाण तो करीत होता. फेसबुकवर त्याचे अकाउंट रविवारी पहाटे दोनपर्यंत दिसत होते. पण नंतर ते डीऍक्टिव्ह केले गेले असून ते तपास यंत्रणाच्या सूचनेनुसार केले गेले असावे, अशी सूत्रांनी माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com