sabotage to finish my political career | Sarkarnama

माझे राजकीय करियर संपविण्याचा डाव : योगेश टिळेकर

उमेश घोंगडे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

पुणे : खोटा गुन्हा दाखल करून माझी राजकीय कारकिर्द संपविण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून माझे राजकीय विरोधक करीत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांना केला आहे.

येवलेवाडी विकास आराखड्यासंदर्भात गेल्या महिन्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आता या नव्या प्रकरणात थेट खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने आमदार टिळेकर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. हे आऱोप सिद्ध झाले तर आपण राजकारण सोडण्यास तयार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. 

केबल खोदाई करणाऱ्या कंपनीला  50 लाख रूपये खंडणी मागितल्याबद्दल टिळेकर व त्यांच्या भावावर आज कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात बोलताना आमदार टिळेकर म्हणाले, "" 22 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत लोकांसाठी अनेक चांगली कामे केली आहेत. म्हणून तर लोकांनी मला व माझ्या आईला महापालिकेत निवडून दिले आहे. आमदार म्हणूनदेखील मी निवडून आलो आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम करीत आहे. मात्र विधानसभेची आगामी निवडणूक समोर ठेऊन विरोधकांनी माझ्याविरोधात साधलेला हा डाव आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे.

संबंधित लेख