sabko ghar modi | Sarkarnama

 केंद्राचे शंभर पैसे लोकांपर्यंत पोचतात : मोदी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जुजवा (गुजरात) : देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 2022 मध्ये जेव्हा 75 वर्षे पूर्ण होतील तेव्हा प्रत्येक कुटुंबाकडे स्वत:चे घर असेल असे स्वप्न मी पाहतो आहे. तसेच केंद्राच्या विविध गृहनिर्माण योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणालाही लाच द्यावी लागणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे कार्यक्रमात बोलताना केले. 

दिवंगत पंतप्रधान आणि कॉंग्रेस नेते राजीव गांधी यांच्या वचनाचा दाखला देताना मोदींनी सांगितले की, "" राजीव गांधी म्हणत असत केंद्राने एक रूपया दिल्यानंतर गरिबांपर्यंत केवळ पंधरा पैसे पोचतात. आता आमच्या सरकारच्या काळात दिल्लीतून एक रूपया दिला जातो स्थानिकांपर्यंत शंभर पैसे पोचतात.'' 

वलसाडला लागून असलेल्या जुजवा खेड्यात आयोजित रॅलीत बोलताना मोदींनी लाभार्थ्यांचे स्वागत केले. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा हा गृहप्रवेश असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या योजनेअन्वये राज्यामध्ये एक लाखांपेक्षाही अधिक घरे उभारण्यात आली आहेत असा दावाही त्यांनी केला. 

मोदींनी गुजरातमधील विविध योजनांच्या लाभार्थ्यांसोबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवादही साधला. वलसाडमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर मोदींनी सौराष्ट्रातील जुनागडच्या दिशेने कूच केली. येथे त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर गुजरात न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभालाही त्यांनी हजेरी लावली. 

संबंधित लेख