s t chakka jam in diwali | Sarkarnama

वेतनवाढीसाठी दिवाळीत एसटीचा चक्का जाम 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

मुंबई : मूळ वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे मंगळवारी आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण केले. उपोषणानंतर संघटनेचे प्रतिनिधी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली; मात्र त्यात तोडगा निघाला नाही. या संदर्भात तोडगा न निघाल्यास 1 नोव्हेंबरपासून राज्यभरात उपोषण करू, असा इशारा संघटनेने दिला आहे. 

यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करारानुसार 4,849 कोटी जाहीर झाले; मात्र त्यापैकी अद्याप 1,500 कोटी सरकारच्या तिजोरीत शिल्लक आहेत. ती रक्कमही कर्मचाऱ्यांना मूळ वेतनवाढीसाठी वापरावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी मंगळवारी संघटनेतर्फे उपोषण करण्यात आले. 

उपोषणानंतर महामंडळाच्या कार्यालयात प्रशासनासोबत संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चा केली; मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने चर्चा अपूर्ण राहिली. उद्या पुन्हा बैठक होणार असून, त्यात तोडगा न निघाल्यास ऐन दिवाळीत राज्यभर उपोषण केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे. 

गतवर्षी दिवाळीतच कर्मचाऱ्यांनी चार दिवस संप पुकारला होता. त्यामुळे एसटी महामंडळाचे सुमारे 135 कोटींचे नुकसान झाले होते. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महामंडळाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, सुटीवर जाणाऱ्यांची बदली केली जाईल, अशी तंबीही प्रशासनाने दिली आहे.  
 
संबंधित लेख