Ruling BJP treating citizens like trash | Sarkarnama

सत्ताधारी भाजपने केला  पुणेकरांचाच "कचरा' 

मंगेश कोळपकर
शनिवार, 6 मे 2017

पुणे : शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षांपूर्वी दिलेल्या आश्‍वासनाचा त्यांनाच विसर पडला असून एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने पुणेकरांचाच कचरा केला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी एका निवेदनाद्वारे शनिवारी व्यक्त केली.

दोन खासदार, आठ आमदार, 98 नगरसेवक अशी भाजपकडे एकहाती सत्ता आहे. तरीही शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न त्यांना सोडविता आलेला नाही. स्मार्ट सिटी झालेल्या पुण्यात रस्त्यावरील कचऱ्याने थैमान घातले आहे. तरीही भाजपच्या लोकप्रतिनिधींनी डोळ्याला पट्टी बांधली आहे. त्यामुळे भाजपला निवडून दिल्यामुळे पुणेकरांमध्ये आता नैराश्‍य पसरू लागले आहे, असे गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे.

संबंधित लेख