rss will change constutution dhanjay munde | Sarkarnama

2022 मध्ये संविधान बदलण्याचा आरएसएस, भाजपचा अजेंडा- धनंजय मुंडे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

औरंगाबादः   राज्यसभेत बहुमत मिळताच संविधान बदलायचे हा आरएसएस आणि भाजप सरकारचा अजेंडाच असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. 

औरंगाबादेतील संविधान बचाव, देश बचाव मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रात भाजपची सत्ता येताच शाकाहार आणि मासांहार असे दोन नवे धर्म जन्माला आले, सरकार तुमच्या चुलीपर्यंत येऊन पोचले. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या म्हणजे संविधानाचीच हत्या होती अशी टीका देखील धनंजय मुंडे यांनी केली. 

माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम भारत देश 2020 मध्ये महासत्ताक होणार असे नेहमी सांगायचे. पण आताचे सरकार सगळ्या गोष्टी मुर्हूत पाहून ठरवत असल्याने महासत्ताक होण्यासाठी देखील त्यांनी 2022 चा मुर्हूत काढल्याचा टोला मुंडे यांनी लगावला. या सदंर्भात काही विचारवंतानी आपल्या यामागचे कारण सांगितले ते असे की, 2022 मध्ये राज्यसभेत पाशवी बहुमत मिळवून त्या जोरावर घटना बदलण्याचा अंजेडा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजप सरकारचा अंजेडा असल्याचा दावा त्यांनी केला. 

आज पत्रकार सुरक्षित नाहीयेत, सामान्यांच्या बोलण्याचा अधिकार नष्ट झाला आहे. संविधान वाचवण्याची सरकारची इच्छा शक्ती नाही. जातीजातीत तेढ निर्माण केले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येकानेच संविधान बचाव, देश बचाव मोहिम हाती घेण्याची गरज असल्याचे मुंडे म्हणाले.

संबंधित लेख