जितेंद्र आव्हाडांचा मुंब्रा - कळव्याचा गड सर करण्यासाठी संघ सरसावला !

आव्हाड यांनी सातत्याने हिंदुत्वविरोधात घेतलेली भूमिका निवडणूकीच्या दरम्यान त्यांच्या विरोधात वापरली जाणार असल्याची चर्चा आहे.
Jitendra-Avhad
Jitendra-Avhad

ठाणे  :    राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या वतीने मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्रा - कळवा विधानसभेला सुरुंग लावण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात झाल्याचे कळते.

ठाणे जिल्ह्यावर शिवसेना भाजप युतीची मजबुत पकड आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील तिन्ही खासदार युतीचे निवडून आले आहेत.  

ठाणे जिल्ह्यावर गेल्या वीस वर्षापासून उजव्या विचारसणीच्या राजकीय पक्षाचा पगडा मजबूत झाला आहे. पण त्याचवेळी या जिल्ह्यातील अद्याप काही विधानसभा मतदारसंघ मात्र युतीसाठी अद्यापही अवघड बालेकिल्ले मानले जात आहेत. मुंब्रा  कळवा हा मतदारसंघ मुस्लीम बहुल असला तरी कळवा येथे बहुसंख्य मतदार हिंदू आहेत. पण त्यानंतरही गेले दोन विधानसभेच्या निवडणूकीत युतीला या गड सर करता आलेला नाही.

 त्यातही आक्रमक हिंदुत्वाच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने हा मतदारसंघ युतीच्या नेत्यांना जास्त प्रमाणात खूपत असतो. पण मूळात आजच्या घडीला तरी आव्हाड यांच्यासमोर नक्की उमेदवार कोण उतरविणार हाच प्रश्न युतीसमोर आहे. कारण एकाचवेळी कळवा आणि मुंब्रा  येथील मतदारांना आर्कर्षित करणारा उमेदवारच युतीकडे उपलब्ध नाही. त्यामूळे आजच्या घडीला युतीच्या पातळीवर उमेदवार चाचपणीबाबत सामसूम आहे.

मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या एका मुख्य प्रचारकाने राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्र आणि गोव्या जबाबदारी असलेल्या संबधित प्रचारकाने त्यासाठी गेल्या आठवडयात कळवा येथे  एक विशेष बैठक घेतल्याचे कळते.

त्यावेळी आव्हाड यांचा पराभव न केल्यास त्यांची आक्रमकता अधिक वाढीला लागेल अशी भीती व्यक्त करण्यात आल्याचे कळते. त्यासाठी आतापासून कामाला लागण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. त्यासाठी विधानसभेच्या निवडणूकीची वाट न पाहता आतापासून आव्हाड यांना लक्ष्य करण्याचे ध्येय ठरविण्यात आल्याचे कळते. 

आव्हाड यांनी सातत्याने हिंदुत्वविरोधात घेतलेली भूमिका निवडणूकीच्या दरम्यान त्यांच्या विरोधात वापरली जाणार असल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com