RSS & Ram Temple | Sarkarnama

संघपरिवाराकडून राममंदिरासाठी धर्मजागरण सभेच्या हालचाली 

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

सरकारने कायदा करून किंवा वटहुकूम काढून जागा ताब्यात घ्यावी ही भूमिका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीनंतर काहीशी बदलण्यात आली काय याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

मुंबई  अयोध्येतील प्रस्तावित राममंदिरासाठी वटहुकुम काढण्याऐवजी वाट पहाण्याचा मार्ग चोखाळला जाण्यावर संघपरिवाराचे सध्या तरी एकमत झाल असल्याचे समजते.

सर्वोच्च न्यायालयात जानेवारीपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे,त्यातून यासंबंधी समाधानकारक तोडगा निघेपर्यत वाट पहावी मात्र ते करतानाच धर्म जागरण सभा ,हिंदुंचे मेळावे अशी आयोजने करण्याचेही जवळपास निश्‍चित झाले आहे.

 राममंदिरासाठी जनमत तयार करण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा एकदा आंदोलन छेडले जाईल असे विधान करतानाच न्यायालयाला यासाठी डेडलाईन देणे संघसंस्कृतीत बसत नसल्याचे संकेत सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिले आहेत. मात्र संतपरिवार मंदिरनिर्माणासाठी जनतेने एकत्र यावे, ठिकठिकाणी मेळावे आयोजित करावेत या तयारीत आहे.

कायदयाची बाजू पूर्णत: मान्य करतानाच जनतेचा याबाबतचा आग्रह लोकशाहीपदधतीने समोर यावा असे निश्‍चित झाले आहे. सरकारने कायदा करून किंवा वटहुकूम काढून जागा ताब्यात घ्यावी ही भूमिका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीनंतर काहीशी बदलण्यात आली काय याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

मात्र संघाने यासंदर्भात आधीपासूनच भूमिका स्पष्ट केली असून हिंदुंच्या मानसिकतेचा अंत बघू नये या विधानाचा योग्य तो अर्थ लावा असेही सांगण्यात आले आहे.संतपरिषदेने यासंदर्भात भूमिका घेतल्यावर परिवाराच्या विविध संस्थांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाईल.

संबंधित लेख