कॉंग्रेसच्या काळातही विकास कामे झाली : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सध्या विकासाची गती संथ आहे. हे खरे असले तरी गेल्या 70 वर्षांमध्ये काहीच विकास झाला नाही, असे मी मानत नाही. मी सकारात्मक विचार करणारा आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचलक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेसच्या काळातही विकास कामे झाली : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपूर : सध्या विकासाची गती संथ आहे. हे खरे असले तरी गेल्या 70 वर्षांमध्ये काहीच विकास झाला नाही, असे मी मानत नाही. मी सकारात्मक विचार करणारा आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचलक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
 
प्रहार या संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. भागवत यांनी भाजपच्या काही नेत्यांच्या वक्तव्याला छेद दिल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी कॉंग्रेसमुक्त भारतच्या संदर्भात केलेल्या भाजप नेत्यांच्या विधानावर डॉ. मोहन भागवत यांनी नापसंती व्यक्त केली होती. गेल्या काही वर्षांपासून गेल्या 70 वर्षांमध्ये काहीच विकास झाला नाही, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपासून गल्लीतील नेत्यापर्यंत बोलले जाते. या सर्वांना डॉ. भागवत यांनी विधाने करताना "दक्ष' राहावे, असे सल्ला दिल्याचे बोलले जात आहे. 

यावेळी बोलताना डॉ. भागवत म्हणाले, भारत 70 वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला. त्याचवेळी जपान व इस्त्राईल सुद्धा स्वतंत्र झाले. या दोन्ही देशांनी आपल्यापेक्षा अधिक प्रगती केली आहे. आपला देश विकासात बरेच मागे पडला आहे. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. याचा अर्थ देशात विकासच झाला नाही, हे म्हणणे योग्य नाही. मी सकारात्मक विचार करणारा आहे. गेल्या 70 वर्षात निश्‍चितपणे देशात प्रगती झालेली आहे. परंतु या प्रगतीचा वेग संथ होता. आताही तो वेग कमीच असल्याचा उल्लेखही डॉ. भागवत यांनी केला. 

सध्या सुरू असलेल्या देशभक्तीच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले, देशभक्ती ही काही ठेक्‍याने मिळणारी वस्तू नाही. देशभक्ती मनात असावी लागते. त्यादृष्टीने सजगतेने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत सध्या देशभक्तीवरून उठसूठ बोधामृत पाजणाऱ्यांचेही त्यांनी कान टोचले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com