rss is poison kharge | Sarkarnama

रा.स्व.संघ हे विष, ते चाखण्यात काय अर्थ ?, मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : "आरएसएस' हे विष आहे. ते चाखण्यात काही अर्थ नाही. जिवाशी खेळ आहे असा इशारा देतानाच राहुल गांधी संघाच्या व्यासपिठावर जाऊ नये असा सल्ला कॉंग्रेसच्या कोअर कमिटीने केली आहे. 

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना संघाने निमंत्रण दिल्याची जोरदार चर्चा देशात आहे. संघाने पुढील महिन्यात एक राष्ट्रीयस्तरावर चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्राचे निमंत्रण राहुल यांच्यासह डाव्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनाही देण्यात येणार आहे. अद्याप संघाने तसे निमंत्रण दिलेले नाही. 

राहुल हे संघ आणि भाजपचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. संघावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही. तरीही संघ त्यांना निमंत्रण देणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसापासून माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे की राहुल हे संघाच्या व्यासपिठावर जाणार की जाणार नाहीत. त्यातच कॉंग्रेसच्या कोअर कमिटीनेही राहुल यांना संघाच्या व्यासपिठावर जावून नये असा सल्ला दिला आहे. 

महाराष्ट्राचे प्रभारी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे, की संघ हे विष आहे हे सर्वांना माहित आहे. तरीही विषाची परीक्षा आपण घ्यायची 
का ? संघ आपल्या विचारसरणीचा प्रचार करीत आहे. असे असताना आपण त्यामध्ये वाटेकरी होण्याचे काही कारण नाही. ज्यांना देशाची घटना मान्य नाही आणि ज्यांचा मनुस्मृतीवर विश्वास आहे अशांच्या मांडीला मांडी लावण्यात काही अर्थ नाही. 

राहुल गांधीच काय कोणत्याही कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे आपण यापूर्वीही जाहीर केले होते याची आठवणही खर्गे यांनी यावेळी करून दिली,  

संबंधित लेख