rss formation by another man | Sarkarnama

संघाच्या नावाप्रमाणे संस्था नोंदणीचा प्रयत्न फसला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यासाठी माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी दिलेला अर्ज अखेर फेटाळण्यात आला. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संस्था नोदणी करण्याचा मून यांचा प्रयत्न फसला. अखेर धर्मादाय आयुक्त कार्यालयात अशी नोंदणी झालीच नाही. 

नागपुरातील माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संस्था नोंदणीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात काही महिन्यापूर्वी प्रस्ताव सादर केला होता. यामुळे नागपुरात बरीच खळबळ उडाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी संघटना नोंदणीकृत संस्था आहे काय ? असा प्रश्‍न या निमित्ताने पुढे आला होता. 

जनार्दन मून यांच्या प्रस्तावाला काहींनी आक्षेप घेतला होता. नागपूरच्या धर्मादाय आयुक्तांनी मात्र मून यांचा प्रस्ताव "राष्ट्रीय' या शब्दामुळे फेटाळल्याचे सांगितले. कोणत्याही संस्थेच्या नावात राष्ट्रीय हा शब्द नको. केवळ सरकारी संस्थांच्या नावांमध्ये राष्ट्रीय शब्द ग्राह्य धरण्यात येईल, असे मत धर्मादाय आयुक्तांनी नोंदविल्याने जनार्दन मून यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत करण्याचा प्रयत्न फसला. 

धर्मादाय आयुक्तांचा निर्णय मान्य नसल्याचे जनार्दन मून यांनी सांगितले. धर्मादाय आयुक्तांनी राज्य सरकारच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असेही त्यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 
 
संबंधित लेख