rss captures ambedakar granth samiti : Narke | Sarkarnama

डॉ. आंबेडकर ग्रंथ समिती रा. स्व. संघाच्या ताब्यात : हरी नरके

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 23 डिसेंबर 2018

पुणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ समितीच्या पुनर्रचनेवरून सध्या वाद सुरू झाला असून, ही समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात गेल्याचा आरोप ज्येष्ठ अभ्यासक हरि नरके यांनी केला आहे. संघाचे म्हणून ज्याना या समितीवर स्थान देमयात आले आहे त्यांनी आंबेडकरांची पुस्तके पाहिली असतील, असा टोला नरके यांनी लगावला आहे.

नरके यांनी ट्विटरवरून हा हल्ला चढविला आहे. शिक्षणमंत्री या समितीचे अध्यक्ष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे यांचे २२ खंड प्रकाशित करणारी राज्य शासनाची ग्रंथ समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपुर्ण कब्ज्यात गेलेली आहे. प्रा. डोळस यांना त्यांच्या अकाली दु:खद निधनापुर्वी समितीवरून हटवण्यात आलेले होते.

रा. स्व. संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते, रमेश पांडव, सुनिल भंडगे, वैजनाथ सुरनर, शामराव अत्रे, मिलिंद कांबळे, प्रविण रणसुरे, ईश्वर नंदापुरे, श्यामा घोणसे, संजय साळवे, पी. जी.जोगदंड यांची नवे आंबेडकरी तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, असे नरके यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर, प्रा. जनार्दन वाघमारे, प्रा. आ. ह. साळुंखे, बाबा आढाव, जनार्दन चांदूरकर, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. रमेश जाधव, प्रा. रावसाहेब कसबे, प्रा. दत्ता भगत, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, नितीन राऊत यांनाही समितीवरून कमी करण्यात आले.

स्वतः नरके, वसंत मून आदींनी या समितीवर या पूर्वी काम केले होते. सरकारने राजन गवस, नामदेव कांबळे, शरणकुमार लिंबाळे या लेखकांचाही नव्या समितीत समावेश केला आहे. नरके यांनी त्यांना संघाच्या कार्यकर्त्यांच्या यादीत टाकलेले नाही. 

संबंधित लेख