rss cader, sanghatan mantri, mumbai | Sarkarnama

 संघाच्या मुशीतील तरूणाचीत  संघटन मंत्रीपदावर वर्णी लागणार 

सरकार नामाब्यूरो 
मंगळवार, 11 जुलै 2017

मुंबई : भाजपच्या पक्ष बांधणीत महत्त्वपूर्ण पद मानले जाणाऱ्या संघटन मंत्री पदावर रवींद्र भुसारी यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री म्हणून संघाच्या मुशीतून तयार झालेल्या तरुण क्रियाशील व्यक्तीची निवड होण्याची शक्‍यता आहे. भुसारी यांच्या राजीनामा नंतर महाराष्ट्रचे प्रभारी म्हणून व्ही. सतीश यांच्या कडे अतिरिक्त भार देण्यात आला आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्यासह तरुण चेहऱ्यांचा या पदासाठी विचार होण्याची शक्‍यता आहे. 2011 सालापासून महाराष्ट्र संघटन मंत्री पदावर कार्यरत असलेले भुसारी यांच्या कार्यकाळात भाजपला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यश मिळाले होते. मात्र अमित शाह याच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर बूथ लेव्हलमध्ये पक्ष बांधणीत त्रुटी असल्याबाबत त्यानी नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीनंतर भुसारी यांनी नव्या दमाच्या व्यक्तीला संधी मिळावी यासाठी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. तसेच भुसारी यांची हकालपट्टी झाली नसून त्यानी राजीनामा दिला आहे असे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले. 

संघटन मंत्री हे महत्वाचे पद जनसंघपासून भाजपच्या राजकीय पक्षांच्या वाटचालीत संघटन मंत्री हे महत्वाचे पद मानले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ज्या व्यक्तीचे नाव निश्‍चित होते त्यांची या पदावर निवड केली जाते. 90 सालापर्यंत भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष पेक्षा संघटन मंत्री पदावरील व्यक्तीला मोठा मान होता. नंतर पक्षरचनेत बदल करण्यात आला. संघटन मंत्री पदावरील सरचिटणीस पदावरील 4 ते 5 व्यक्तींपैकी एक पद संघटन मंत्रीपद मानले गेले. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन हे महाराष्ट्र संघटन मंत्री असताना कधीही मंत्रालयात न जाता जनतेची कामे करून घेत होते अशी माहिती भाजप एका पदाधिकाऱ्याने यांनी दिली.

संबंधित लेख