राष्ट्रहित जोपासणाऱ्यांना मतदान करा : संघाचे आवाहन

तीन राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आता शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे छत्तीसगड राज्यात मोठ्या प्रमाणात नोटाचा वापर केल्याने भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले आहे. त्यामुळे संघाने लोकसभा निवडणुकित राष्ट्रहीत जोपासणाऱ्यांना मतदान करण्याचे ट्‌विट केले आहे.
राष्ट्रहित जोपासणाऱ्यांना मतदान करा : संघाचे आवाहन

नागपूर : तीन राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आता शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे छत्तीसगड राज्यात मोठ्या प्रमाणात नोटाचा वापर केल्याने भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले आहे. त्यामुळे संघाने लोकसभा निवडणुकित राष्ट्रहीत जोपासणाऱ्यांना मतदान करण्याचे ट्‌विट केले आहे.

भारतीय राज्यघटनेने  निवडणुकांच्या माध्यमातून स्वत:चा उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. निवडणूक भारतीय लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. सामान्य माणसाला संविधानाने दिलेली ही ताकद असून, एक मतदार म्हणून आपले कर्तव्य पार पाडा. अधिकाराचा योग्य व पूर्ण सद्‌उपयोग करा, असे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आपल्या ट्‌विटवरून म्हटले आहे. भारतीय संविधानाचे रक्षण आणि विकास व्हावा, सामान्यांना शासनाच्या सेवांचा लाभ व्हावा. विश्‍वपटलावर भारताचा गौरव व्हावा या उद्देशाने मतदान आवश्‍यक असून, राष्ट्रविरोधी ताकद कोण आहेत हे सामान्य जाणकार मतदार म्हणून आपण समजतो. आपले मत देशाची दिशा ठरवणार असून, मतांच्या आधारे निवडून येणारी आगामी सरकार देशहितार्थ श्रेष्ठतम कार्य करेल हा विश्‍वास व्यक्‍त करेल या अपेक्षेने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे भैयाजी जोशी यांनी म्हटले आहे.

निवडणूक शांततेत व संवादपूर्ण व्हावी
निवडप्रक्रीया शांत व संवादपूर्ण वातावरणात व्हावी ही आवश्‍यकता आहे. देशात राजकीय मतभिन्नता असली तरी लोकशाही त्याचे स्वागतच करते. पण मतभिन्नता संघर्षाचे कारण व्हायला नको याची काळजी प्रत्येकाने घेण्याचे आवाहन भैयाजी जोशी यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com