rpi faction and ramdas athawale | Sarkarnama

आठवले गटातून वेगळा गट, आता युनायटेड रिपब्लिकन पार्टी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

नगर : भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाबरोबर (आठवले गट) युती करताना आश्वासने पाळले नसल्याने रिपब्लिकनमधील नाराज कार्यकर्त्यांनी युनायटेड रिपब्लिन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची घोषणा नाशिक येथे 4 ऑगस्ट रोजी मेळाव्यात होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विरोधक म्हणून एका पक्षाची भर पडणार आहे. 

या पक्षाचे प्रवक्ते व प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले) राजीनामा देवून आठवले यांच्याशी काडीमोड केली आहे. आता नवीन ध्येय धोरणे घेवून स्वतःची वेगळी चूल मांडून भाजपला विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत गायकवाड म्हणाले, भाजपने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण देण्याचे सांगणाऱ्या भाजपने संबंधित समाजाच्या हातावर तुरी दिल्या आहेत. प्रत्यक्षात राज्यात व देशातही संख्याबळ असताना घटना दुरुस्ती करणे भाजपला अशक्‍य नाही, मात्र तसे होत नाही. तसेच रिपब्लिकन पक्षातील आठवले वगळता इतर कोणत्याही कार्यकर्त्यांना पद दिले नाही. त्यामुळे आंबेडकरी जनतेबरोबर भावनिक राजकारण केले आहे. त्यामुळेच नाराज असलेल्या सुमारे दीडशे प्रमुख नेते, पदाधिकारी असलेला गट घेवून युनायटेड रिपब्लिन पक्ष स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
समविचारी पक्षाशी युती करणार 
नाशिक येथे मेळावा घेवून पक्षाची घोषणा केली जाईल. त्यानंतर समविचारी असलेल्या पक्षासोबत युती करण्याचे धोरण युनायटेड रिपब्लिकनचे असेल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रिपब्लिकनमधील फूट पडून एक गट स्वतंत्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

संबंधित लेख