Rowing Goldman Dattu Bhoknal Story | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

भारताच्या रोईंगचा 'गोल्डमॅन' दत्तू भोकनळ सोंगतोय शेतातील मका

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

चांदवड तालुका दुष्काळात सदैव होरपळणारा तालुका. येथील तळेगावरोही हे दत्तु भोकनळचे मूळ गाव. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोईंगच्या सिंगल स्कल्स गटात त्याने सुवर्ण पदक पटकावले. अमेरिकेतील रिओ येथे 2016 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी तो भारतीय संघात होता. आंतरराष्ट्रीय सेलीब्रिटी असलेला आणि रोईंग स्पर्धेत पाण्याच्या प्रवाहाविरोधात पाणी कापत आपली नौका पुढे दामटत सर्वांची दमछाक करणारा दत्तू दुष्काळापुढे हतबल झाला आहे.

चांदवड : भारतीय रोईंगचा आंतरराष्ट्रीय सेलीब्रिटी असलेला दत्तू भोकनळ सध्या आपल्या मुळगावी आला आहे. हा सबंध परिसर दुष्काळाने होरपळतो आहे. त्याने शेतातील पाण्याअभावी करपलेला मका स्वतः सोंगला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या दत्तुला चांदवडच्या दुष्काळापुढे मात्र शरण जावे लागल्याचे विदारक चित्र आहे. 

चांदवड तालुका दुष्काळात सदैव होरपळणारा तालुका. येथील तळेगावरोही हे दत्तु भोकनळचे मूळ गाव. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोईंगच्या सिंगल स्कल्स गटात त्याने सुवर्ण पदक पटकावले. अमेरिकेतील रिओ येथे 2016 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी तो भारतीय संघात होता. सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शिबिरात सराव करणारा दत्तू सुट्टीवर आहे. दोन दिवसांपूर्वी तो मुळ गावी आला होता. पावसाअभावी पिरसरातील सर्व पीके करपली आहेत. त्यात वडीलोपार्जीत दीड एकर शेतातील मकाही त्याला अपवाद नव्हता. सध्या सोंगणीचा हंगाम आहे. दत्तूचे आई-वडील हयात नाहीत. त्यामुळे अन्य कुटुंबीयांसमवेत त्यानेही आपला मका सोंगला.

आंतरराष्ट्रीय सेलीब्रिटी असलेला आणि रोईंग स्पर्धेत पाण्याच्या प्रवाहाविरोधात पाणी कापत आपली नौका पुढे दामटत सर्वांची दमछाक करणारा, सुवर्ण पदक मिळवणारा दत्तू दुष्काळापुढे मात्र अन्य सामान्य शेतकऱ्यांप्रमाणेच शरण गेला आहे. निसर्गापुढे कोणाचे काहीच चालत नाही हेच खरे. 

ज्या मातीत जन्मलो आणि रमलो, तिला कदापी विसरु शकत नाही. गावाशी नाळ जुळलेली आहे. नोकरीआधी शेतातील सर्व कामे केली असल्याने त्याची लाज वाटत नाही. मात्र, सध्याची स्थिती विदीर्ण आहे. सरकारने लवकर दुष्काळ जाहीर करावा - दत्तू भोकनळ 

संबंधित लेख