नाणार `पेटले` : मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केल्याची उद्धव यांची टीका 

नाणार `पेटले` : मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केल्याची उद्धव यांची टीका 

मुंबई : कोकणवासीयांच्या मुळावर येणारा नाणार प्रकल्पासंबंधीचा करार प्रत्यक्षात आणणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला विश्‍वासघात असून दिल्लीत त्यांचे काही चालत नाही याचेच हे उदाहरण असल्याची जहरी टिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी केली आहे.

जपान येथून आज उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातले पत्रक जारी केले आहे. उद्ययोगमंत्री सुभाष देसाई सध्या काही कार्यालयीन कामासाठी परदेशात गेले असल्याने त्यांनी या कराराच्या अंतिम प्रस्तावाला मूक संमती तर दिलेली नाही ना अशी शंका सेनेतील काही मंडळींनी बोलून दाखवली आहे. त्याच वेळी स्थानिकांची मान्यता नसेल तर सौदी कंपन्यांशी करार झाला तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात येवू शकेल, कसा असा प्रश्न नारायण राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटल्यानंतर केला आहे.

केंद्राने यासंदर्भात महाराष्ट्राला अंधारात ठेवले की शिवसेनेच्या विरोधाला काडीचीही किंमत न देता पुढे जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेनुसार घेतला असे प्रश्न केले जात आहेत. दरम्यान सेना या विषयात तुटेस्तोवर ताणणार काय असाही प्रश्न विचारला जातो आहे.

धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी तयार होत असताना शिवसेनेला आपल्या बाजूला ठेवणाऱ्या फडणवीसांना यासंदर्भात नेमके काय करायचे आहे त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नाणार करार झाला तरी ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय काही होवू शकणार नाही असे फडणवीस यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. 

मुख्यमंत्री भेटीनंतर नारायण राणे यांचे स्पष्टीकरण 

या प्रकल्पाचे अन्य एक विरोधक खासदार नारायण राणे यांनी मात्र सौदी कंपनीशी करार म्हणजे प्रकल्पाला मान्यता असा नाही असे स्पष्ट केले आहे. स्थानिकांची मान्यता मिळाल्याशिवाय नाणार प्रकल्प प्रत्यक्षात कसा येवू शकतो असा प्रश्‍न नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना केला.
स्थानिकांना विश्‍वासात न घेता या संदर्भात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे आश्‍वासन फडणवीस यांनी यासंदर्भात दिले होते. शिवसेनेने जाहीररित्या यासंदर्भात टिकाटिप्पणी करण्यापूर्वीच राणे यांनी सौदी कंपनीशी करार म्हणजे प्रकल्पाला मान्यता समजायचे काय असा प्रश्‍न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदत करण्याची भूमिका नारायण राणे यांनी केली आहे काय अशी विचारणा होते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com