माणसाला जिंकून घेण्याचा जयंत पाटलांचा स्वभाव

एक अभ्यासू नेतृत्व, कधीही चर्चेसाठी वेळ देणारे व विषयाच्या खोलात जावून प्रत्येकासोबत संवाद साधणारे व्यक्ती म्हणून नक्कीच मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. पुढच्या माणसाला जिंकून घेण्याच्या स्वभावाने त्यांनी बापुनी ठेवलेले 'जयंत' हे नाव सार्थकी लावले आहे, असे म्हणता येईल!
Pawar Patil
Pawar Patil

मी राजकारणात सक्रिय नसल्यापासून आदरणीय जयंत पाटील आणि माझे विशेष संबध आहेत .  साखर कारखाना आणि राज्यातील धोरणांबद्दलचा त्यांचा व्यासंग पहिल्यापासूनच प्रभावित करत आला आहे. सात ते आठ वर्षांपुर्वी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली साखर व कृषी क्षेत्रातील काम पाहण्यासाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर गेलो होतो. जयंत पाटलांसोबत पहिल्याच भेटीत मी प्रभावित झालो. ज्यांचं व्यक्तिमत्व आपणाला सहज आवडतं, अशा निवडक व्यक्तींपैकी ते आहेत. 

गतवर्षी आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली  युरोपचा दौरा आखण्यात आला होता. या दौऱ्यात मी आणि जयंत पाटील सहभागी होतो. जागतिक पातळ्यांवर होणारं कृषी संशोधन समजून घेणं, त्याचा भारतासाठी काय उपयोग होऊ शकतो यासाठी दौरा होता. दिवसभर संशोधन संस्थाना भेटी देण्यात येत असल्यामुळे साहजिकच सर्वांना थकवा येत असे. 

टूर आयोजकांनी 'वॉटर्लू'स भेट देण्याविषयी सुचवलं. वॉटर्लू नाव ऐकताच जयंत पाटील म्हणाले, 'तेच ना जिथे नेपोलियनचा पराभव झाला होता?' दूसऱ्या दिवशीच्या या भेटीत जयंत पाटील संपुर्ण इतिहास समजून घेत होते. पराभव मग तो कोणाचाही असो त्याचं कारण मिळालं की त्या चूका पुन्हा होत नाहीत, इतकं साधं गणित अर्थमंत्री म्हणून कार्यकाळ गाजवलेले जयंत पाटील सहज लावत होते. 

अर्थमंत्री हा विषय निघाला म्हणून आवर्जून उल्लेख करावा लागेल तो त्यांच्या स्वभावाचा. मी अनेकदा पाहीलंय की, आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवलो, नाष्टा केला की साहेब बील आवर्जून पाहतात. कोणत्या गोष्टी चुकीच्या लावल्या नाहीत का? कमीजास्त आहे का? याचा पुन्हा हिशोब करतात मग ते बील फक्त चहाचं असेल तरी .  मला वाटतं त्यांची हीच गोष्ट साहेबांनी ओळखली असेल. जी व्यक्ती एक रुपयाचादेखील व्यवस्थीत हिशोब लावते ती व्यक्ती अर्थमंत्री म्हणून आदर्श काम करु शकते.

 जनतेच्या खिश्यातला एक रुपायादेखील किती महत्वाचा असतो, याची जाणीव जयंत पाटलांनी आपल्या कार्यकाळात मांडलेले अर्थसंकल्प पाहीले की लक्षात येते. राज्याच्या राजकारणात अजितदादा असोत, जयंत पाटील असोत वा आर. आर. आबा असोत या सर्वांनीच आपआपल्या कामांची एक विशेष शैली निर्माण केली. त्यांच्या शैलीकडे पाहूनच काम करण्याची पद्धत, एखाद्या व्यक्तीसोबत सहजपणे संवाद साधण्याची, काम समजून घेण्याची मानसिकता राजकारणात येणारी नवी पिढी शिकते. 

ते अर्थमंत्री असतानाची एक आठवण आहे. मी कॉलेजात होतो. घरी नेहमीच राजकिय चर्चा होत. मला आठवतंय, तेव्हा जयंत पाटील यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरू होती. जयंत पाटील यांच्या डेडिकेशनबद्दल तेव्हा कौतुक होतं होतं. त्याचं कारण म्हणजे तेव्हा त्यांचा भीषण अपघात झाला होता. व्हिलचेअरवर बसून त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. ही एखाद्या गोष्टीबद्दल सर्वस्व झोकून देवून काम करण्याची होती. 

तशीच त्यांची दूसरी गोष्ट म्हणजे राज्यामध्ये कृत्रीम पावसाच्या प्रयोगाची. राज्यात पहिल्यांदा कृत्रीम पाऊस पाडण्यासंबधी त्यांनी काम केलं. स्वत: इंजिनियरींगसारख्या क्षेत्रातून आल्यामुळे नवतंत्रज्ञानाचा फायदा जास्तीत जास्त कसा होवू शकतो, याकडे त्यांचा कल असतो. 


 

( लेखक इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत . )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com