Rohit Pawar targets Udhhav Thakre | Sarkarnama

उद्धव ठाकरे अल्लड त्यांना सांभाळून घ्या ,असेच बाळासाहेबांना म्हणायचे असावे : रोहित पवार 

सरकारनामा
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा !त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या असाच असावा.

पुणे   : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी उडी घेतली  आहे . रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टवर उद्धव  ठाकरे यांच्यावर टिका करताना  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्त्यव्याचा आधार घेतला आहे . 

एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्व गुणांची तारीफ करीत असताना दुसरीकडे रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत . आपले काका अजित पवार यांच्यावर टीका करणारा एवढा मोठा लेख लिहिण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी दोन ओळींचा राजीनामा लिहायला हवा होता असा टोलाही त्यांनी लगावला आहे . 

आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये रोहित पवार लिहितात , " बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा !त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या असाच असावा.

बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते. 'मार्मिक' असो कि 'सामना 'त्यांनी टिका देखील जहाल केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केला.

उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतलं नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत.

इतका लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता."

संबंधित लेख