rohit pawar karjat tour | Sarkarnama

रोहित पवारांनी 'कर्जत' पिंजून काढला, चोंडीला विशेष वेळ दिला! 

मुरलीधर कराळे 
शनिवार, 12 जानेवारी 2019

राष्ट्रवादी- काँग्रेसच्या आघाडीत ही जागा काँग्रेसला गेल्यास मिनाक्षी साळुंके तर राष्ट्रवादीला गेल्यास मंजुषा गुंड या इच्छुक आहेत.

नगर: राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी काल कर्जत तालुका पिंजून काढला. या दौऱ्यामुळे ते कर्जत- जामखेड मतदारसंघात उमेदवारीची तयारी तर करत नाहीत ना, अशा चर्चा सुरू झाली आहे.

या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लढणार, अशी चर्चा मागील वर्षापासून आहे. मध्यंतरी पवार यांचे दौरेही वाढले होते. नंतर मात्र ती चर्चा थंडावली. दरम्यानच्या काळात राजेंद्र फाळके यांना राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष पद दिले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या माध्यमातून महिला आघाडीचे अध्यक्षपद याच मतदारसंघात देण्यात आले आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी कर्जत तालुका पिंजून काढला. पालकमंत्री राम शिंदे यांचे गाव असलेला चोंडी परिसरात आवर्जुन वेळ दिला. युवक राष्ट्रवादीच्या एकूण ११ शाखा सुरू करून युवकांचे संघटन सुरू केले. एव्हढेच नव्हे, तर या मतदारसंघाची जागा लढविण्याबाबत पक्ष सांगेल ती जबाबदारी स्विकारण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख