Rohit Pawar gets Strength from Sharad Pawars Tour | Sarkarnama

तुझी मागणी झाली बघ.... म्हणताच रोहित पवार हसले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 मे 2019

बीड जिल्ह्याचा दुष्काळी पाहणी दाैरा उरकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कर्जतला आहे. राशीन येथे आले असता, रोहितदादांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावर शरद पवार रोहित पवार यांच्याकडे हसून म्हणाले, 'तुझी मागणी आली बघ,' त्यावर रोहित पवार यांनीही हसून दाद दिली. पवारांचा हा दुष्काळी दौरा रोहित पवारांच्या पथ्यावर पडला. 

नगर : बीड जिल्ह्याचा दुष्काळी पाहणी दाैरा उरकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कर्जतला आहे. राशीन येथे आले असता, रोहितदादांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावर शरद पवार रोहित पवार यांच्याकडे हसून म्हणाले, 'तुझी मागणी आली बघ,' त्यावर रोहित पवार यांनीही हसून दाद दिली. पवारांचा हा दुष्काळी दौरा रोहित पवारांच्या पथ्यावर पडला. 

तीन दिवासांपूर्वी रोहित पवारांनी हा मतदारसंघ पिंजून काढला होता. या दोन्ही दौऱ्याची भाजपचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना धडकी भरली नसेल, तर नवलच.  रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. पवार यांनी या मतदारसंघात मोफत टॅंकरही सुरू केले आहेत. तसेच दौऱ्यामागे दौरे करून हा परिसर पिंजून काढला आहे. यापूर्वीही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करताना त्यांनी विधानसभेची पेरणी केली आहे.

गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार
शरद पवार यांनी दुष्काळाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. छावणीचालकांशी बोलून छावणीत असलेल्या उणिवा नोंदवून घेतल्या. हे सर्व गाऱ्हाणे आपण मुख्यमंत्र्यापुढे मांडणार आहोत. दुष्काळप्रसंगी शेतकऱ्यांना धीर देणं हे सरकारचे काम आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. मागील दुष्काळही अनुभवले, परंतु हा दुष्काळ अत्यंत भयंकर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारदरबारी प्रयत्न करणार, असे आश्वासन शरद पवार यांनी जामखेड येथे दिले. रोहित पवार यांनीही, आपण या तालुक्याचा दौरा केला असून, शेतकऱ्यांचे खूप हाल सुरू असल्याचे सांगितले.

छावणीचालक पालकमंत्र्यांचेच कार्यकर्ते?
टॅंकरच्या खेपांमध्ये गैरप्रकार होत आहे. छावण्यांमध्ये चाराही निकृष्ठ दर्जाचा दिला जातो. तालुक्यात छावण्या देताना भेदभाव झाला. सर्व छावणीचालक पालकमंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत, अशी कैफियत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्यासमोर मांडली. पवार यांनीही या प्रकरणात जातीने लक्ष घालू असे आश्वासन दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख