राष्ट्रवादीचे दोन 'युवा रोहित' माणदेशात एकत्र येणार!

राष्ट्रवादीचे दोन 'युवा रोहित' माणदेशात एकत्र येणार!

पुणे : जेष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे दोन युवा नेते २७ जानेवारीला सांगली जिल्हयातील दिघंची गावात युवा शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येत आहेत. 

विशेष म्हणजे हा मेळावा ज्यांनी आयोजित केला आहे त्यांचेही नाव रोहित आहे आणि ते आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हणमंतराव देशमुख यांचे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हा मेळावा होत असल्याने त्याला महत्व आहे.  

इंडियन शुगर मिल्स असोशियनचे अध्यक्ष रोहित पवार सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभर फिरत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.
कर्जत, हडपसर, पुरंदर येथून त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण पवार यांनी याबाबत अजून भाष्य केलेले नाही. 

आर आर पाटील यांचे पुत्र शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईला आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत यांनी २०२४सालचे आमचे तासगावचे उमेदवार रोहित पाटील असं सांगत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीपासूनच ते त्यांच्या आई आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळताना दिसतील आणि नंतर थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. 

या युवा शेतकरी मेळाव्यात आटपाडी तालुक्यातील दुष्काळ, डाळिंब शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, अपुऱ्या राहिलेल्या पाणीयोजना या विषयी चर्चा होणार आहे. रोहित पवार आणि रोहित पाटील यांची आजवर एकदाही भेट झालेली नाही या मेळाव्याच्या निमित्ताने बारामतीच्या पवार घराण्याची तिसरी पिढी आणि अंजनीच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी एकत्र येत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com