rohit patil's reading habbit | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

पुस्तकाच्या वेडासाठी आर आर आबांच्या रोहितची पुण्यात दौड !

 संपत मोरे 
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

आबांच्या पुस्तकप्रेमाचं वेड रोहित यांच्याकडे आलं आहे.

पुणे: माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांचा मुलगा रोहित पाटील यांनाही आबांप्रमाणे पुस्तकाची आवड आहे. पुण्यात महिन्यातून एकवेळा तरी ते पुस्तकाच्या खरेदीसाठी येत असतात.

पुण्यात नवीन पुस्तक लवकर मिळतात म्हणून त्यांची एक चक्कर पुण्याला असतेच. पुण्याला आल्यावर ते गावाकडच्या मित्राच्या मोटरसायकलीवरून पुस्तकांच्या दुकानांना भेटी देतात आणि त्यांना आवडेल ती पुस्तक खरेदी करतात. पुण्यातील महत्वाची पुस्तकांची दुकाने आणि तेथे मिळणाऱ्या पुस्तकांच्याबाबत त्यांना माहिती आहे. पुण्यात जर पुस्तकांचे पुस्तक प्रदर्शन असेल तर ते आवर्जून येतात. 

आर. आर. पाटील यांच्या ग्रंथप्रेमाची प्रचिती त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणातून यायची. त्यांनी अगदी धावपळीच्या काळातही पुस्तकांची आवड जपली होती. राज्यातील अनेक लेखकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. आबा प्राचार्य पी बी पाटील यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनमध्ये शिकले. त्यांचं ग्रंथवेड तिथंच तयार झालं. त्यानंतर ते वाढत गेलं. त्यांच्या स्वतःच्या दोन लायब्ररी होत्या. एक त्यांच्या अंजनी येथील घरी आणि दुसरी मुंबईत. आबांच्या तोच पुस्तकप्रेमाचा वारसा रोहित जपत आहे. 

रोहित पाटील सांगतात,"मी लहान असताना आबांना रात्री उशिरापर्यंत वाचत बसलेलं बघायचो. त्यांचं पुस्तकावरच प्रेम मला बघायला मिळालं. मलाही नवीन पुस्तक वाचायला मिळालं कि आनंद होतो."

संबंधित लेख