rohit patil tells r r patils birthday story | Sarkarnama

आजीला फोन जोडून दिल्याशिवाय आबांचा वाढदिवस होतच नव्हता! 

संपत मोरे 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

आजीला फोन जोडून द्यायची आयडिया आमची असायची पण आम्ही मात्र तसं दाखवत नव्हतो.आबा आत आल्यावर रात्री उशिरा आम्ही कुटूंबातील मंडळी त्यांचा वाढदिवस साजरा करायचो. तेव्हा तो दिवस संपून दुसरा दिवस सुरु झालेला असायचा...आर आर आबांचे सुपूत्र रोहित पाटील सांगत होते. 

'आबांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते कोठे असायचे हे आम्हालाच माहिती नसायचं. रात्री उशिरा ते आजीचा आशीर्वाद घ्यायला घरी यायचे, तेव्हाही घरात गर्दी असायची. आम्ही घरातील मुलं, माझ्या काकी, आई,आजी सगळे केक तयार करून आतल्या खोलीत त्यांची वाट बघत बसलेलो असायचो. रात्रीच्या बारा वाजल्या तरी आबांची गप्पांची मैफल सुरु असायची. आम्ही पोरं आबांना बोलवायला जायचो. पण आबा येतो म्हणायचे आणि पुन्हा गप्पात रमायचे. मग आम्ही आजीला फोन जोडून द्यायचो. आजीचा आवाज ऐकला की आबा लगेच उठून आत यायचे. आजीला फोन जोडून द्यायची आयडिया आमची असायची पण आम्ही मात्र तसं दाखवत नव्हतो.आबा आत आल्यावर रात्री उशिरा आम्ही कुटूंबातील मंडळी त्यांचा वाढदिवस साजरा करायचो. तेव्हा तो दिवस संपून दुसरा दिवस सुरु झालेला असायचा'...आर आर आबांचे सुपूत्र रोहित पाटील सांगत होते. 

"आबांची आणि माझी भेट खूप कमी वेळा व्हायची. तीन तीन महिने त्यांची आणि माझी भेट होत नव्हती. एकदा तर ते माझ्या शाळेजवळून जाणार होते. मी आणि माझा भाऊ रस्त्यावर जाऊन थांबलो. आबांनी आम्हाला पाहिलं पण गडबडीत असल्यानं आमच्याशी फारसे बोलले नाहीत. मग मी लगेच फोन करून आजीला सांगितलं. मग तासभरानी आम्हाला सरांच्याजवळ निरोप आला. मग आम्ही भेटायला गेलो. आमची भेट झाली. ते कामात एवढे व्यस्त असायचे, कुटुंबासाठी त्यांना वेळ देणं शक्‍य नसायचं. त्यामुळे ते जेव्हा भेटतील तेव्हा किती आनंद व्हायचा त्या आनंदाच वर्णन शब्दात व्यक्त करता येणार नाही. 

 

टॅग्स

संबंधित लेख