Rohidas patil & K C Padvi sure about candidature | Sarkarnama

कॉंग्रसतर्फे धुळ्यातून रोहिदास पाटील तर नंदुरबार मधून  के. सी. पाडवी निश्‍चित ?

निखिल सूर्यवंशी 
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

धुळ्यासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील, तर नंदुरबारसाठी आमदार के. सी. पाडवी यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. 

धुळे :  लोकसभेच्या धुळे आणि नंदुरबार मतदारसंघासाठी कॉंग्रेसने मुंबईत आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पाडली. यात धुळ्यासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील, तर नंदुरबारसाठी आमदार के. सी. पाडवी यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. 

दादरमधील कॉंग्रेसच्या टिळक भवनात पक्षाचे केंद्रीय निरीक्षक आशिष दुवा, पी. संदीप, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव गावित, हुसेन दलवाई, आमदार अमरिशभाई पटेल, माजी मंत्री रोहिदास पाटील आदी उपस्थित होते. 

धुळे मतदारसंघासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, मालेगावचे नेते डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, प्रसाद हिरे, जिल्हा बॅंकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, मालेगावचे आमदार असिफ शेख या सात, तर नंदुरबार मतदारसंघातून आमदार के. सी. पाडवी, माजी मंत्री ऍड. पद्‌माकर वळवी, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष शिरीष नाईक, भरत गावित, संगीता भरत गावित या सहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
 

संबंधित लेख