जमीन खरेदीप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर 

  जमीन खरेदीप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर 

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात जमीन खरेदीतील कथित अनियमततेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

हरयाणातील गुरुग्राम येथे गृहसंकूल व व्यापारी संकुले उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. या एफआयआरमध्ये दोन रियल इस्टेट कंपन्यांचीही नावे असल्याची माहिती असून या प्रकरणी वड्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या 420 कलमासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. 

या व्यवहारात वड्रा यांनी 50 कोटींचा लाभ उठविल्याचा आरोप आहे. स्वस्त दरात जमीन खरेदी करून सरकारच्या मदतीने जास्त दरात विकण्याचा आरोप वाड्रांच्या स्कायलाईट कंपनीवर होता. भूपेंद्र सिंह हुड्डा मुख्यमंत्री असताना हे प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणामध्ये रॉबर्ड वड्रा यांच्या नावावरून विरोधी पक्ष कॉंग्रेसला निशाण्यावर घेत होते. 

वड्रा, हुडा या दोघांसह स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ या कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेचे कलम 420, 120 ब, 476, 468 आणि 471 अन्वये वडेरा यांच्याविरुद्ध केस दाखल केली आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com