Road block in Jalna for Dhangar reservation | Sarkarnama

धनगर आरक्षणासाठी जालन्यात रास्ता रोको 

भास्कर बालखंडे 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

रास्ता रोकोमुळे आैरंगाबाद -जालना महामार्गासह ,अंबड चाैफुली, आदी भागात वाहतुक खोळंबली होती.

जालना : धनगर समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने सोमवारी (ता.13) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जालन्यासह जिल्ह्याच्या विविध भागात रास्तारोको,निदर्शने करून शासनाविरूध्द रोष व्यक्तकरण्यात आला . 

धनगर समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी युवकांनी केली. रास्ता रोकोमुळे आैरंगाबाद -जालना महामार्गासह ,अंबड चाैफुली, आदी भागात वाहतुक खोळंबली होती.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आैरंगाबाद चैाफुली,अंबड चाैफुली, सिंधखेडनाका,पीरिपंपळगाव,विरेगाव,बदनापूर ,सेलगाव, भोकरदन तालुक्यातही विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत रस्त्यावर टायर जाळले.त्यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतुक खोळंबली होती. जिल्ह्याच्या अन्य भागातही आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असल्याेच सुत्रानी सांगितले.

संबंधित लेख