rjd rally, patna | Sarkarnama

भाजप भगाओ, देश बचाओ 

वृत्तसंस्था
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी रणशिंग फुंकले असून आज " भाजप भगाओ, देश बचाओ' काढण्यात येणाऱ्या रॅलीकडे कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठ फिरवली आहे. मात्र, कॉंग्रेसचे बडे नेते या रॅलीत सहभागी होणार आहे. मायावती यांनी यापूर्वीच रॅलीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या रॅलीला किती प्रतिसाद मिळतो याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 

वास्तविक लालू प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणारी रॅली अन्य पक्षीय नेत्यांना रूचलेले नाही. तसेच लालू प्रसाद यांची भ्रष्ट नेता अशी जी प्रतिमा बनली आहे. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो या भितीने सोनिया, राहुल, मायावती आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यानीही या रॅलीपासून चार हात लांबच राहण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही लालूंना दुखावायचे नाही म्हणून गुलामनबी आझाद आणि अन्य नेत्यांना या रॅलीत सहभागी होण्याच्या सूचना कॉंग्रेसने दिल्या आहेत. राहुल गांधी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आणि सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थामुळे या रॅलीत सहभागी होणार असल्याचे कॉंग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

या रॅलीवर टीका करताना जेडीयूचे प्रवक्ते के.सी.त्यागी म्हणाले, "" लालू प्रसाद यादव आणि आमचे बंडखोर नेते शरद यादव यांची ही रॅली आहे. या दोघानाही नितीशकुमारांना लक्ष करायचे आहे. वास्तविक नाव भाजपचे घेतात आणि लक्ष्य मात्र आम्हाला करतात. मात्र "भाजप भगाओ, देश बचाओ'ही रॅली काढून राजद हा नकारात्मक राजकारण करीत आहे. त्यांना आमचा पाठिंबा नाही. जेडीयू आणि भाजपचे केंद्रातील आणि बिहारमधील सरकार उत्तम काम करीत आहे. त्यामुळे दोन्ही यादवांना पोटदु:खी होत आहे. 

दरम्यान, "भाजप भगाओ, देश बचाओ रॅलीत' लालू प्रसाद शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जाते. त्यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळेल अशीही राजकीय वर्तृळात चर्चा आहे. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून देशात जातीयवादाला खतपाणी घातले जात आहे. राष्ट्रीय एकात्मता कायम राहण्याची भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन लाल प्रसाद हे सातत्याने करीत आहे.  

संबंधित लेख