RJ Malishka fever reaches to opposition | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

विरोधी पक्षांवर मलिष्का फीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 जुलै 2017

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठक आणि स्वतंत्र पत्रकार परिषदेत आरजे मलिष्का फीवर दिसून आला. 

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठक आणि स्वतंत्र पत्रकार परिषदेत आरजे मलिष्का फीवर दिसून आला. 

मुंबईतील खड्ड्यांच्या विषयावर आरजे मलिष्का हिने रचलेल्या "सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का" ही धून असलेले गाणे चांगलेच गाजले. त्याचा विरोधी पक्षनेत्यांवरही चांगलाच प्रभाव पडल्याचे दिसून आले. दोन्ही कॉंग्रेसमध्ये फूट पडली असतानाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेते विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खास शैलीत या गाण्याचा उल्लेख केला.

दोन्ही पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर "राष्ट्रवादीचा आमच्यावर भरवसा नाय का" असा मिश्‍कील सवाल विखे-पाटील यांनी केला. "शिवसेनेची अवस्था एफ एम रेडिओच्या उघड केली, शिवसेनेचा मेंदू झोल झोल, विरोधी पक्षात मात्र कोणताही झोल नाही", अशी टिप्पणी विखेपाटील यांनी केली.

यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, "कुणाचा कुणावर भरोसा नाय ते विखेच ओळखून आहेत"
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. " तीन वर्षात सरकारचा कारभार गोलगोल, कारभारामागे झोलझोल, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री सोनू, म्हणून सरकारवर भरोसा राहिला नाय" अशी टीपण्णी मुंडे यांनी केली. 

 

संबंधित लेख