reservation in promotion : Harish Salve to represent state in supreme court | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नती आरक्षण :  सर्वोच्च न्यायालयात सरकारतर्फे हरीश साळवे  - दिलीप कांबळे 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

अण्णाभाउ साठेंना भारतरत्न देण्याची शिफारस


लोकशाहीर अण्णाभाउ साठे यांना भारतरत्न देण्याची समाजातील सर्वच थरांतून मागणी होत आहे.अण्णाभाउ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी शिफारस राज्याकडून केंद्र सरकारला करण्यात येणार असल्याचेही दिलीप कांबळे यांनी सांगितले. अण्णाभाउ साठे यांचे मुंबईतील घाटकोपर चिरागनगर येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून जी कुटुंबे बाधित होणार आहेत त्यांचेही पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई    : सरकारी नोक-यांमधील मागासवर्गीय कर्मचा-यांना पदोन्नतीतील आरक्षण देण्याला मनाई करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून या खटल्याचे कामकाज राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकिल हरिष साळवे यांनी पहावे अशी सामाजिक न्याय विभागाची इच्छा असून त्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.

सरकारी नोक-यांमध्ये मागासवर्गीय अधिकारी-कर्मचा-यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्‌दबातल ठरविला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील
करण्याचीही सरकारला मुदत दिली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सुमारे 13 हजार सरकारी
कर्मचारी-अधिकारी बाधित होणार आहेत.

 कदम यांची 250 कोटींची मालमत्ता जप्त
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रमेश कदम यांची 250 कोटींची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे.

अजून दोन ते तीन जिल्हयांमधील तपास बाकी असून तो पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण घोटाळयाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे दिलीप कांबळे यांनी सांगितले. रमेश कदम यांनी घेतलेल्या 60 महागडया वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी आम्ही न्यायालयाकडे मागितली आहे.

यामध्ये ऑडी, स्कॉर्पिओ, इनोव्हा आदी गाडयांचा समावेश असल्याचेही दिलीप कांबळे यांनी सांगितले. रमेश कदम याचा औरंगाबाद येथील अडीच एकराचा भूखंड तसेच मलबार हिल येथे बंगला बांधण्यासाठी घेतलेला 106 कोटी रूपयांचा भूखंडही ताब्यात घेण्यात आल्याचे दिलीप कांबळे यांनी सांगितले.

संबंधित लेख